पुणे ड्रग्जच्या विळख्यात, सोशल मीडियावर ड्रग्ज तयार करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

On: June 24, 2024 1:16 PM
pune news
---Advertisement---

Pune News | सुसंस्कृत आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. या शहरात गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहीलेली नाहीये. त्यामुळे येथे दिवसा सुद्धा गुन्हा होत असताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात पोर्शे कार प्रकरणी घटना घडली होती. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असताना आता अणखी एका घटनेनं पुणे हादरलं आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील (Pune News) एफसी रोडवरील एका नामांकीत हाॅटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. पुण्यातील Liquid Leisure Lounge या हाॅटेलच्या बाथरुममध्ये तरुण ड्रग्ज तयार करत होते. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

मॅनेजर ताब्यात-

संबंधित व्हिडीओ व्हायरल (Pune News) झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पोलिसांनी L3 हॉटेलमधील 2 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये हॉटेलचा मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला.

News Title : pune news drug case video viral

महत्त्वाच्या बातम्या-

काळजी घ्या! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

पार्किंगमध्ये कार जास्त वेळ पार्क करताय? तर होऊ शकतं मोठं नुकसान

“शिक्षणाचे माहेरघर पुणे आता ड्रग्ज आणि पबचं होतंय माहेरघर”; या नेत्यानी साधला निशाणा

“गद्दारांना लोकं रस्त्यावर बांबूचे फटके..”; संजय राऊतांचं मुख्यमंत्री शिंदेंना प्रत्युत्तर

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; 1 जुलैपासून होणार मोठा बदल

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now