धक्कादायक! पुणे शहरात उच्चशिक्षित डॉक्टरने कोयत्याने केला हल्ला

Pune News | पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. मात्र शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात शिक्षितांच्या हातात हत्यारं येऊ लागली आहेत. यामुळे शिक्षणाचा पाया घातलेल्या पुणे शहरात (Pune News) गुन्हेगारीचं सत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे. यामुळे सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात अपेक्षित नसलेल्या घटना घडू लागल्या. पुणे शहरात (Pune News) एका उच्चशिक्षित डॉक्टरने कोयत्याने हल्ला केला आहे. हा हल्ला आर्थिक देवाण घेवाणीतून झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

उच्चशिक्षित डॉक्टरने कोयत्याने केला हल्ला

पुण्यात जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या दोन गुंड साथीदारांनी मिळून प्रितेश बाफना यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिलेल्या तरूणाने डॉ. विवेक गुप्ताकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे परत न केल्याने ही धक्कादायक घटना घडली. पुणे शहरात  शिक्षित डॉक्टरांच्या हातातही कोयता असल्याचं दिसून आलं. (Pune News)

या प्रकरणात वाघोलीमधील लोणीकंद पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगचं वर्चस्व आहे. त्यांची दहशत देखील पुणे शहरात (Pune News) आहे. आता डॉक्टरच्या हातातच कोयता आल्याने खळबळ उडाली आहे.  यामुळे पुणे शहर हे कोणत्या मार्गाने चाललं आहे. पुणे शहरात (Pune News)  कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल उपस्थित होताना दिसतो आहे.

तसेच काही दिवसांआधी पुणे शहरात एका तरूणाने एका मुलीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला होता. मुलगी ही विद्यालयात शिक्षण घेत होती. तर युवकाने मुलीला प्रेमाची मागणी घातली होती. मात्र युवतीने नकार दिल्याने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला  होता. मात्र तिथे असलेल्या उपस्थितांकडून युवतीचा बचाव झाला.

पुणे शहराच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

पुणेकर कोयता गँगचा सुपडासाफ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी अनेकदा पोलिसांना देखील तक्रार केली होती. मात्र त्याचा काहीच एक उपयोग झाला नाही. मात्र आता डॉक्टराच्या हातात कोयता आल्याने पुणे शहराच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.

News Title – Pune News Doctor Himself Took Koyta In His Hand

महत्त्वाच्या बातम्या

आज ‘या’ 4 राशींना प्रत्येक कार्यात यश मिळेल!

“साहेब मला माफ करा”, वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना मेसेज

वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेताच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कडेवर बुमराहचा लेक, फोटो होतोय व्हायरल

“देशाच्या संसाधनावर आणि शासकीय योजनेवर हिंदूंचा अधिक वाटा”