पुणे हादरलं! प्रेयसीला लॉजवर नेलं अन् त्याने..; पुढचा घटनाक्रम ऐकून थरथराल

On: October 11, 2024 11:23 AM
Crime News
---Advertisement---

Pune News | गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात धक्कादायक घटना घडत आहेत. यामुळे पुण्यातील सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेवर अनेक प्रश्न करण्यात येत आहेत. पुण्यात महिलांच्या बाबतीत विचित्र घटना समोर आल्या आहेत. अशात आणखी एका घटनेमुळे पुणे हादरलं आहे. पिंपरी-चिंचवड भागात एक भयानक घटना घडली आहे. (Pune News)

पिंपरी-चिंचवड शहरातील एका लॉजमध्ये एका तरुणाने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला आहे. इतकंच नाही तर, त्याने स्वतः देखील आत्महत्या केलीये. या तरुण मुलाने स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपरी-चिंचवड येथे घडली धक्कादायक घटना

तरुणाने प्रेयसीवर केलेल्या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लॉजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या प्रकरणी पोलीस आता अधिकचा तपास करत आहेत. प्रेम प्रकरणातून हा सर्व प्रकार घडला असावा असा संशय पिंपरी पोलिसांना असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज लॉज मध्ये हा प्रकार घडला आहे. (Pune News)

नितेश नरेश मिनेकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून हा तरुण आपल्या प्रेयसीसोबत लॉजमध्ये गेला होता. ते दोघं तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. मात्र लॉज मध्ये गेल्यानंतर काही वेळातच नितेश मिरेकर याने त्याच्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वतः त्याने गळफास घेत आत्महत्या केली. आता पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Pune News)

News Title : Pune News crime in pimpri chinchwad

महत्वाच्या बातम्या –

गुड न्यूज! दसऱ्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर!

यंदा राज्यात होणार तब्बल 6 दसरा मेळावे; कुणाचा कुठे आणि कधी होणार मेळावा?

900 एकरचं मैदान, 500 क्विंटल बुंदी..; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी

‘या’ जिल्ह्यांत आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार!

नवरात्रीचा आज नववा दिवस, देवी सिद्धिदात्री 12 पैकी ‘या’ राशींना पावणार!

Join WhatsApp Group

Join Now