Pune News | नाशिक-पुणे महामार्गावरील कळंब येथे धक्कादायक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिरडलं आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुणे (Pune News) पोर्शे प्रकरणाची आठवण करून दिली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी आहे. त्याला रूग्णालयात देखील केलं होतं. त्याच्यावर आता उपचार सुरू आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)
या अपघातानंतर आता आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नसल्याचं मोहिते पाटील म्हणाले. त्यानं मद्यपान केलं नसल्याचं वक्तव्य आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलं होतं. (Pune News)
नेमकं काय म्हणाले मोहिते पाटील?
पुण्यातील (Pune News) खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, “अपघातानंतर माझा पुतण्या मयुर साहेबराव मोहिते हा कुठं ही पळून गेला नाही. याशिवाय त्यानं मद्यपान केलं नाही,” असं आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितलं.
“माझा पुतण्या नारायणगाव मार्गे कळंबकडून खेडकडे येत होता. अपघात का झाला? कुठे झाला? त्यावेळी अंधार होता, त्यामुळे कसा झाला? कोणाला काहीच कल्पना नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलीस सगळ्या प्रकारची चौकशी करत आहेत. झालेली गोष्ट ही शंभर टक्के चुकीची आहे. मी मृत कुटुंबाच्या दुखात सहभागी झालो. मी स्वत: कुटुंबाची भेट घेणार. कोणत्याही चुकीच्या गोष्टाचं समर्थन करणार नाही”, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले.
माझा पुतण्या कधीही दारू पिला नाही. तो इंजिनिअर आहे. तो कधीही आयुष्यात दारू प्यायला नाही. त्यामुळे असले प्रकार त्याने केले नसल्याचं दिलीप मोहिते पाटील म्हणाले आहेत. अपघात झाला तेव्हा कोणीच नव्हतं. त्यामुळे प्रथमदर्शनी चूक नेमकी कोणाची? ही माहिती पोलिसांनी दिली नाही. पोलीस ज्यावेळी माहिती देतील. त्यावेळी ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले. (Pune News)
“आरोपांमध्ये काहीही तथ्य वाटत नाही”
माझा पुतण्या अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस चौकशी करतील. पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरूणाला माझ्या पुतण्याने रूग्णवाहिकेत टाकलं. त्यामुळे इतर आरोपांमध्ये मला काहीही तथ्य वाटत नाही, असं मोहिते पाटील म्हणाले आहेत.
News Title – Pune News Accident In MLA Dilip Mohite Patil Statement About His Nephew
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात आणखी एक भीषण अपघात, आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
लग्नासाठी सोनाक्षी सिन्हा हिंदू धर्म सोडणार?, होणाऱ्या सासऱ्याने स्पष्टच सांगितलं
“जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद…”; छगन भुजबळांचं जोरदार भाषण
“औकातीत राहा बेट्या हो, आम्ही शांत बसलो म्हणजे..”; छगन भुजबळांचा जरांगेंना थेट इशारा
पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढणार; ‘या’ 5 गोष्टींनी वाढवा इम्युनिटी






