Pune Accident l पुण्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच आता कोरेगाव पार्क भागातील एबीसी फार्म रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव ऑडी कार चालकाने दोन दुचाकींना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील तीन तरुण जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं? :
या धक्कादायक प्रकरणानंतर मुंढवा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ऑडी कार चालक तरुणाला अटक देखील
केली आहे. या घटनेतील मृत तरुणाचे नाव रौफ अकबर शेख असे आहे. या घटना प्रकरणी कार चालक आयुष प्रदीप तयाल (वय 34, राहणार हडपसर) या तरुणाला अटक देखील करण्यात आली आहे.
काल (10 ऑक्टो) मध्यरात्री दीडच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील एबीसी फार्म रस्त्याने मृत तरुण रौफ शेख मुंढव्याकडे निघाला होता. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने दोन दुचाकींना धडक दिली. त्यावेळी एका दुचाकीवरील तीन तरुण फेकले गेले. मात्र सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यानंतर कार चालक आयुषने दुचाकीस्वार रौफला धडक दिली. मात्र या अपघातात रौफ गंभीर जखमी झाला. अपघातानंतर कार चालक आयुष घटनास्थळावरून पसार झाला.
Pune Accident l पोलिसांनी कार चालकाला अटक केलं :
मात्र अपघाताची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रौफला तातडीने खासगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
अशातच या घटनेतील अपघात करुन पसार झालेल्या कारचा वाहन क्रमांक मिळाला. त्यानंतर पोलिसांनी कार चालक आयुषला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज सकाळी अटक देखील करण्यात आली आहे.
News Title – Pune Hit And Run Case Bike Rider Dies
महत्त्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! दसऱ्या आधीच सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर!
यंदा राज्यात होणार तब्बल 6 दसरा मेळावे; कुणाचा कुठे आणि कधी होणार मेळावा?
900 एकरचं मैदान, 500 क्विंटल बुंदी..; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी
‘या’ जिल्ह्यांत आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार!
नवरात्रीचा आज नववा दिवस, देवी सिद्धिदात्री 12 पैकी ‘या’ राशींना पावणार!






