Pune News– थंडीच्या दिवसांत गार वाऱ्यामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. तापमानात अचानक बदल झाल्याने डोक्यापर्यंत पोहोचणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरू होतो, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.
शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरताही कारणीभूत
डोकेदुखीमागे शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता हे देखील एक कारण असू शकते. व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी कोवळ्या उन्हात बसणे, दूध आणि केळीचे सेवन करणे उपयुक्त ठरते. हिवाळ्यात लवंग, वेलची, काळीमिरी, अश्वगंधा यांसारख्या औषधी वनस्पतींचा काढा पिणे देखील फायदेशीर ठरू शकते.

आयुर्वेदिक उपाय योजना
आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांत तुळस आणि आले घातलेला ब्लॅक टी पिणे लाभदायक ठरते. डोकेदुखीवर हळद घातलेले दूध पिणे हा देखील एक प्रभावी उपाय आहे. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. वात-पित्तवर्धक पदार्थांचाही परिणाम डोकेदुखीवर होतो. हुलग्याचे माडगे पिणे हा डोकेदुखीवर गुणकारी उपाय आहे.
डोकेदुखीपासून बचाव कसा करावा ?
थंडीच्या दिवसांत डोकेदुखीपासून दूर राहण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. थंड हवेत फिरणे टाळावे, बाहेर जाताना डोके झाकून ठेवावे, गरम कपड्याने सायनस व कपाळाचा भाग झाकून ठेवावा, असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सुरेश व्यवहारे यांनी दिला आहे. कोणतीही गंभीर लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांना भेटून औषधोपचार करून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
News Title: Pune Headaches in winter? Consult a doctor!
महत्त्वाच्या बातम्या-
प्रयागराज कुंभमेळ्यात ‘या’ बाबांनी वेधलं सर्वांचं लक्ष, तब्बल 32 वर्ष केली नाही अंघोळ!
“देवेंद्रजी, धस यांना जाब विचारणार की बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?”
चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; WHO ने दिली अत्यंत धक्कादायक बातमी
लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना; स्वतः कृषिमंत्र्यांनी दिली कबुली
रिक्षाचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा नियम लागू; …नाहीतर परवाना होणार रद्द!






