पुण्यात गणपती पाहायला जाताय? तर ‘या’ ठिकाणी असणार पार्किंग सोय

On: September 14, 2024 2:28 PM
Pune Traffic Diversion
---Advertisement---

Pune Traffic Diversion l गणेशोत्सव काळात यानेच भाविक भक्त पुण्यात गणपती बाप्पाचे दर्शन घेयला येत असतात. कारण पुण्यातील गणपती हे देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे नागरिक गणपती व मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पुणे शहरात येतात. मात्र यादरम्यान वाहतुकीवरून अनेक नागरिकांची गैरसोय होते. यासाठी यंदाच्या वर्षी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील काही महत्वाचे रस्ते हे सायंकाळी 5 नंतर गर्दी संपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय गणेशोत्सवानिमित्ताने पुणे शहरातील तब्बल 27 ठिकाणी पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

पार्किंगची सोय कोणत्या ठिकाणी असणार? :

गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरात मध्यवर्ती भागात 27 ठिकाणी वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. कारण पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान आणि विसर्जनादिवशी अनेक लोक उपस्थित असतात. मात्र यादरम्यान अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याने त्यांना वाहन पार्क करण्याचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी या गोष्टींचा विचार करून पुण्यातील मध्यवर्ती भागात 27 ठिकाणी पार्किंगची सोय करून दिली आहे.

यासह 11 ते 18 सप्टेंबरपर्यंत पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता हे रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत.

Pune Traffic Diversion l या ठिकाणी असणार पार्किंगची सोय :

शिवाजी आखाडा, SP महाविद्यालय, मंगळवार पेठ, जैन हॉस्टेल, हमालवाडा, नारायण पेठ, फर्ग्युसन महाविद्यालय, BMCC रस्ता, SSPM, कर्वे रस्ता यासह अन्य काही ठिकाणी चार चाकी पार्किंगची सोया करण्यात आली आहे.

याशिवाय न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, नारायण पेठ, पेशवे पार्क, गोगटे प्रशाला, सारसबाग, मित्रमंडळ चौक, दांडेकर पूल ते गणेश मळा, डेक्कन जिमखाना, पार्वती ते दांडेकर पूल, आपटे रोड, विमलाबाई गरवारे प्रशाला आणि इतर रस्त्यांवर दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय काण्यात आली आहे.

News Title : Pune Ganpati Festival Traffic Diversion

महत्त्वाच्या बातम्या-

केंद्राने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; होणार फायदाच फायदा

देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट!

ईद-ए-मिलादची सुट्टी 16 ऐवजी ‘या’ तारखेला मिळणार; सरकारने केला मोठा बदल

सोन्याची भरारी! हजारो रुपयांनी महागलं; काय आहेत आजचे भाव?

आजपासून ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार; तुमच्या शहराचं नाव आहे का तपासा?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now