पुण्यात गणपती मिरवणुकीला येताय? तर या ठिकाणी करा गाड्या पार्क, मेट्रोचं काय?

On: September 17, 2024 3:20 PM
Pune Ganesh Visarjan
---Advertisement---

Pune Ganesh Visarjan l आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अनेकजण पुणे शहरात मिरवणुक पाहायला येत असतात. मात्र भाविकांची यावेळी मोठी गैरसोय होत असते. मात्र यंदाच्या वर्षी प्रशासनाकडून मोठी तयारी केली आहे. बाप्पाच्या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात त्यामुळे प्रशासनाने दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय, सुरक्षा आणि वैद्यकीय मदत अशा गोष्टींची तयारी केली आहे.

वाहतुकीसाठी ‘हे’ रस्ते बंद असणार :

गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात पार्किंगची सोय करून देण्यात आली आहे, त्यामुळे शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांच्या सोईसाठी आज रात्रभर मेट्रो देखील सुरू ठेवण्यात येणार आहे.

पुणे शहरातील लक्ष्मी रोड, टिळक रोड, केळकर रोड, शिवाजी रोड, जंगली महाराज रोड, कुमठेकर रोड, एफ सी रोड, कर्वे रोड, प्रभात रोड हे रस्ते बंद असणार आहेत.

Pune Ganesh Visarjan l पार्किंगची व्यवस्था कुठे असणार? :

न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाद (दुचाकी), शिवाजी आखाडा, एच.व्ही.देसाई महाविद्यालय (दुचाकी अन् चारचाकी), हमालवाडा, नारायणपेठ (दुचाकी), मंगळवार पेठे (दुचाकी आणि चारचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर (दुचाकी अन् चारचाकी), हरजीवन हॉस्पिटल, पर्वती ते दांडेकर पूर ते गणेश मळा (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवाले प्रशाला, डेक्कन जिमखाना (दुचारी अन् चारचाकी).

संजीवन रुग्णालय मैदान, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), कर्वे रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), दैन हॉस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकी), फर्ग्युसून कॉलेज (दुचाकी अन् चारचाकी), मराठवाडा कॉलेज (दुचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता (दुचाकी अन् चारचाकी), पेशवे पथ (दुचाकी), नदीपात्र भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी अन् चारचाकी)

News Title : Pune Bike Parking Location Ganesh Visarjan Mirvanuk

महत्वाच्या बातम्या –

‘या’ अभिनेत्रीने पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केला; स्वतः दिली कबुली

मला मुख्यमंत्री व्हायचंय…; अजित पवारांच्या मनातील गोष्ट आली ओठावर

ना इंटरनेट, ना कॉलिंग..Jio चं नेटवर्क गायब; नेमकं काय झालं?

दिल्लीचा कारभार पाहणार ‘या’ महिला मुख्यमंत्री!

सोनं पुन्हा 75 हजारांवर, चांदीही सुसाट; आज काय आहेत भाव?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now