पुणेकरांसाठी सर्वात मोठी बातमी! तब्बल ‘इतके’ दिवस रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद

On: May 25, 2026 8:25 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट, फेरीवाले आणि खाऊ गल्ली बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच २६ मेपासून पुढील १४ दिवस शहरात जमावबंदी लागू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांनी दिली.

रात्री १० नंतर व्यवसाय बंद करण्याचे आदेश :

पुणे पोलिसांनी (Pune police) शहरातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी नवीन निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार लहान हॉटेल, फेरीवाले, फुटपाथवरील खाद्य स्टॉल आणि खाऊ गल्ली रात्री १० वाजेपर्यंत बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटना मात्र साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शनिवार रात्रीपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

अलीकडे शहरात घडलेल्या गोळीबार आणि मारहाणीच्या घटनांनंतर पोलिसांनी कारवाई अधिक कठोर केली आहे. बालाजीनगर परिसरात एका रिक्षाचालकावर गोळीबार आणि मारहाणीची घटना घडली होती. या प्रकरणामागे गुंड सूर्यकांत आंदेकर याचे नाव समोर आले होते. शहरातील हिंसक प्रकार रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

Pune News | गुन्हेगारी कमी झाल्याचा पोलिसांचा दावा :

पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar) यांनी पुण्यात गुन्हेगारी वाढल्याचा दावा फेटाळून लावला. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. पुणे पोलिसांच्या डायल १११ हेल्पलाइनवर ३५ हजार कॉल आले असून पोलिस सात मिनिटांत घटनास्थळी पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेपत्ता मुलींच्या प्रकरणांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ४९ तक्रारींपैकी ३८ मुलींचा शोध लावण्यात यश आले आहे. बहुतांश मुली प्रेमसंबंधांमुळे घर सोडून गेल्याचे तपासात समोर आले. काही प्रकरणांमध्ये सोशल मीडियावरील रिल्स पाहून प्रभावित होऊन मुलींनी घर सोडल्याचेही निदर्शनास आले आहे.

दरम्यान, इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून निषेध मोर्चांची शक्यता व्यक्त होत असताना जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र हा निर्णय नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

News title : Pune Curfew Rules

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now