पुण्यात पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारने महिलेला उडवलं,24 तासांनंतरही गुन्हा दाखल नाही

On: June 13, 2024 6:53 PM
Pune Crime News Bhosari accident
---Advertisement---

Pune Crime News | काही दिवसांपुर्वी पुण्यात बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोघांना कारने उडवलं होतं. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अजूनही तपास सुरूच आहे. अशात पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, 24 उलटूनही पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये.

भोसरी परिसरात हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. याबाबत अजूनही गुन्हा दाखल न करण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातील स्वराज सोसायटी समोर भरधाव कारने महिलेला उडवलं आहे.

भरधाव कारने महिलेला उडवलं

त्यानंरत ती कार न थांबता निघून गेली. या अपघाताची घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघातात त्या महिलेला जखमी करून संबंधित कारचालक कारसह पसार झाला आहे. या घटनेला (Pune Crime News) 24 तास उलटून गेले आहेत.

भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अद्यापही या अपघाताबाबत गुन्हा दाखल केला नाहीये. अशीच एक घटना हिंजवडी भागात देखील घडली होती. दोन दिवसांपुर्वी झालेल्या या अपघाताबद्दल नंतर बातमी समोर आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांकडून अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही

मात्र, या घटनेबाबत अजूनही गुन्हा दाखल न झाल्याने (Pune Crime News) संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यात अपघात होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. या व्यतिरिक्त येथे इतरही गुन्हाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे पुणे पोलिस प्रशासनावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.

News Title : Pune Crime News Bhosari accident

महत्त्वाच्या बातम्या-

ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण

मोठी बातमी! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला नवा अल्टीमेटम

दोन आमदारांचे राजीनामे, आणखी चार आमदार राजीनामे देण्याच्या तयारीत

‘एक जण राजीनामा देतोय तर त्याचा…’; केतकी चितळेनं काढलं महायुती सरकारचं वाभाडं

कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर अखेर करणने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

Join WhatsApp Group

Join Now