पुण्यातील ‘या’ भागात घडली धक्कादायक घटना! 14 वर्षांच्या मुलानं अनेकांना टँकरनं उडवलं

On: June 29, 2024 10:48 AM
Pune Accident
---Advertisement---

Pune Accident l पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे अपघातानंतर आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाकडून पुण्यातील वानवडीत आणखी एक अपघात झाला आहे.

पुण्यात घडली धक्कादायक घटना :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, टँकरच्या धडकेत इतरही काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा टँकर चालवत होता. त्या मुलाने टँकरने अनेकांना धडक दिल्याची घटना घडली आहे. यावेळी सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेला देखील या या 14 वर्षीय मुलाने जोराची धडक दिली. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 14 वर्षीय मुलाला टँकर चालवायला दिल्याने पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या धक्कादायक अपघातानंतर तेथील संतप्त नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून 14 वर्षीय चालकाला पकडून ठेवले आहे. अवजड टँकर अवघ्या 14वर्षांच्या मुलाच्या ताब्यात दिल्याच्या गंभीर प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Pune Accident l अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात :

संतप्त नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणातील टँकर चालकाचे नाव सैफ पठाण असे आहे. अशातच आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तसेच याप्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी तो टँकर देखील ताब्यात घेतला आहे.

या टँकरचा मूळ मालक हा महिंद्रा बोराटे याला देखील पोलीस चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावणार आहेत. तसेच याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

News Title – Pune Accident 14 Year Old Boy Was Driving Tanker And Hit Many Pedestrian On Road In Vanavadi Pune

महत्त्वाच्या बातम्या-

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल; ‘या’ दिवसापासून द्यावे लागणार जास्त पैसे

1 जुलैनंतर सिम पोर्ट करणे होणार अत्यंत अवघड, अन्यथा बसू शकतो लाखोंचा दंड

या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात यश मिळणार

Diabetes रुग्णांसाठी जांभूळ एक वरदानच; जाणून घ्या याचे फायदे

“थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प, दिलेलं आश्वासन पूर्ण करू”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now