पुणेकरांनो… १५ नोव्हेंबरपासून पैसे वाचवणारी योजना सुरू होणार, जाणून घ्या सविस्तर

On: November 8, 2025 1:38 PM
Pune News (12)
---Advertisement---

Pune News | पुणेकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) नागरिकांना आर्थिक सवलत देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रलंबित असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकीसाठी ‘अभय योजना’ (Abhay Yojana) लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 31 जानेवारी 2026 पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना थकबाकीवरील दंडात तब्बल 75 टक्क्यांची माफी मिळणार आहे.

महानगरपालिकेच्या अंदाजानुसार, या उपक्रमातून सुमारे 150 कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. अनेक नागरिकांनी गेल्या काही वर्षांत कर भरला नसल्याने PMC कडे एकूण 12 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मूळ कराची रक्कम 3,158 कोटी असून दंड आणि व्याजाची रक्कम तब्बल 9 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

महानगरपालिकेचा महसूल वाढवण्यासाठी ‘गेमचेंजर’ पाऊल :

या योजनेचा उद्देश म्हणजे कर थकबाकीदारांना प्रोत्साहित करून PMC च्या महसुलात वाढ करणे हा आहे. अनेक करदाते आर्थिक अडचणींमुळे मागील काही वर्षांपासून कर भरू शकले नाहीत. त्यांच्यावर मूळ करासोबतच मोठ्या प्रमाणात दंडही जमा झाला आहे. त्यामुळे, त्यांना दिलासा देण्यासाठी आणि वसुली वाढवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

PMC दर महिन्याला थकबाकीवर 2 टक्के व्याज आकारत होती. त्यामुळे नागरिकांवर वाढते आर्थिक ओझे निर्माण झाले होते. अभय योजनेमुळे आता नागरिकांना दंडाच्या ओझ्यातून मोठा दिलासा मिळणार आहे. हा निर्णय पुणेकरांसाठी फायदेशीर ठरणार असून PMC ला प्रलंबित रकमेची वसुली जलद गतीने करता येईल.

Pune News | घरगुती आणि व्यावसायिक दोघांनाही होणार फायदा :

‘अभय योजना’चा फायदा सर्व प्रकारच्या मालमत्ता धारकांना मिळणार आहे. घरगुती, व्यावसायिक, तसेच औद्योगिक मिळकतधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. नागरिकांनी आपला मूळ कर भरल्यास दंडातून 75% सूट मिळेल, तर फक्त उर्वरित 25% दंड भरावा लागेल. (Pune News)

महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, ही योजना नागरिक आणि प्रशासन दोघांसाठीही ‘विन-विन’ ठरणार आहे. नागरिकांना दंडमाफीच्या स्वरूपात दिलासा मिळेल, तर PMC ला प्रलंबित कररक्कम मिळाल्याने शहराच्या विकासकामांना गती मिळेल. ही योजना सर्व मिळकतदारांसाठी सरसकट लागू राहणार असून नागरिकांनी 31 जानेवारी 2026 पूर्वी आपला कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Pune Abhay Yojana 2025: Big Relief for Property Owners! 75% Waiver on Penalty from November 15 – Full Details Here

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now