अजित पवार विमान अपघातासंदर्भात महत्वाची माहिती समोर!

On: January 29, 2026 2:10 PM
Ajit Pawar Plane Crash Investigation
---Advertisement---

Ajit Pawar Plane Crash | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेनंतर तपास प्रक्रियेबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या भीषण अपघाताने राज्यभरात शोककळा पसरली असून, केंद्र सरकारने चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे. या तपासात कोण सहभागी असणार, प्रक्रिया कशी राबवली जाणार याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय समिती आणि तपास यंत्रणांची हालचाल :

बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय नागरी उड्डयाण मंत्रालयाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या चौकशीसाठी विमान अपघात तपास ब्युरो (Aircraft Accident Investigation Bureau – AAIB) ची टीम तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (Directorate General of Civil Aviation – DGCA) चे तीन सदस्यीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार, या तपासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तो पूर्णपणे पारदर्शक, सखोल आणि ठराविक कालमर्यादेत पूर्ण केला जाणार आहे. (Ajit Pawar Plane Crash)

अजित पवार लिअरजेट 45 (Learjet 45) विमानातून प्रवास करत होते. अपघातस्थळी AAIB चे डायरेक्टर जनरल यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. दुर्घटनेतील विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, चौकशी प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डयाण खात्याने एक्सवरील पोस्टद्वारे दिली आहे. या उपकरणातील माहितीच्या आधारे अपघातामागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे.

Ajit Pawar Plane Crash | ब्लॅक बॉक्स विश्लेषण आणि तपासाचा फोकस :

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (Cockpit Voice Recorder – CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (Flight Data Recorder – FDR) यांना एकत्रितपणे ब्लॅक बॉक्स म्हटलं जातं. हे उपकरण सापडल्यामुळे विमानाच्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय घडलं, पायलटांनी कोणते निर्णय घेतले आणि प्रणालींमध्ये काही बिघाड झाला होता का, याची माहिती समोर येणार आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, या डेटच्या विश्लेषणातूनच अपघाताचं मूळ कारण ठरवता येईल.

केंद्रीय मंत्रालयाने सांगितलं आहे की, AAIB नियम 2025 मधील नियम 5 आणि 11 नुसार तपास सुरू करण्यात आला असून ठराविक SOP नुसार प्रक्रिया राबवली जात आहे. सध्या तपासकर्त्यांचा मुख्य भर दृश्यमानतेची स्थिती, वैमानिकाचा निर्णयप्रक्रिया आणि बारामती विमानतळाशी संबंधित ऑपरेशनल मर्यादा यावर आहे. नियंत्रणात नसलेली धावपट्टी हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा मानला जात असून, लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, AAIB ची तज्ज्ञ टीम बुधवारी संध्याकाळी अपघातस्थळी दाखल झाली असून त्यांनी फॉरेन्सिक प्रक्रिया सुरू केली आहे. ढिगाऱ्यांचा ताबा घेणे, महत्त्वाचे पुरावे संकलित करणे यासोबतच एअरफ्रेम, इंजिन लॉगबुक, देखभाल नोंदी, तपासणी इतिहास आणि विमानातील कागदपत्रे विमान कंपनीकडून मागवण्यात आली आहेत. याशिवाय, क्रू मेंबर्सची पात्रता आणि प्रमाणपत्रांची तपासणीही सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

News Title: Probe Team Formed for Ajit Pawar Crash

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now