Visfot | अभिनेता रितेश देशमुख त्याच्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख त्यांच्या आगामी ‘Visfot’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. रितेश देशमुख आणि फरदीन खान यांच्या आगामी ‘Visfot’ या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ही चित्रपट 6 सप्टेंबरला जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.
गेल्या 2 वर्षांपासून हा चित्रपट रखडला होता. अखेर ओटीटीवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘विस्फोट’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये रितेश आणि प्रियाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘विस्फोट’च्या ट्रेलरमध्ये प्रियाच्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
रितेश देशमुखचा या वेब सीरिजमध्ये वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. ‘विस्फोट’ वेब सीरिजमध्ये रितेश एका पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच रितेश आणि प्रिया बापट एकत्र काम करणार आहेत.
रितेशची पत्नी दाखवलेल्या प्रियाचं अफेअर असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यानंतर रितेश आणि प्रियाच्या मुलाला किडनॅप केल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. चित्रपटात क्राईम थ्रीलर पाहायला मिळणार आहे.
दोन वर्षांपूर्वी ‘Visfot’ चं शूटिंग झालं होतं. क्राईम थ्रिलर चित्रपटात फरदीन आणि रितेशसोबत क्रिस्टल डिसूझा देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर OTT वर प्रदर्शित होणार आहे.
सध्या ‘बिग बॉस मराठी’मुळे अभिनेता रितेश देशमुख चर्चेत आहे. या पर्वाचं तो होस्टिंग करत आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश सदस्यांची शाळा घेताना दिसतो. त्याचं सर्वत्र कौतुकही होत आहे. ‘विस्फोट’ या नव्या वेब सीरिजमधून रितेश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सीरिजमध्ये रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असून प्रिया बापटही त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
… म्हणून अंगाला काय भोकं पडत नाहीत; अजितदादा सुप्रियाताईंना असं का म्हणाले?
खुशखबर! iPhone झाला स्वस्त; मिळतेय 19 हजारांची सूट
वनराज आंदेकरांच्या वडिलांचा अत्यंत धक्कादायक खुलासा!
राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, गृह मंत्रालय फेल झालंय!
भाजपच्या 2 आमदारांमध्ये वादाचा भडका, भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा






