Prithviraj Chavan | लोकसभेच्या चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. आता 20 मे रोजी शेवटचा पाचवा टप्पा पार पडणार आहे. त्यापूर्वी राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा धडाडा लावला आहे. शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी, कॉँग्रेस, भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट या पक्षाकडून सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. अखेरच्या टप्प्यापूर्वी नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत.
महाविकास आघाडी तसंच महायुतीकडून आता पासूनच लोकसभेत किती जागा निवडून येतील, याबाबत अंदाज बांधले जात आहेत. लोकसभेनंतर लगेच विधान सभेच्याही निवडणुका होणार आहेत. अशात राज्यात जर मविआचं सरकार आलं तर, मुख्यमंत्री पदावर कुणाला स्थान मिळणार याबाबत मोठा खुलासा समोर आलाय.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा फार्म्युला कसा असेल, याबाबत मोठं भाष्य केलं आहे.नुकत्याच एका मुलाखतीमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट महाविकास आघाडीचा फार्म्युलाच सांगितला आहे.
सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. यात महायुतीला महाविकास आघाडीकडून तोडीचं आव्हान दिलं जातंय. मविआ लोकसभेच्या निवडणुकीसारखं मोठं आव्हान विधानसभेच्या निवडणुकीमध्येही देण्याच्या तयारीत आहे. अशात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल?, यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण ?
“राज्याचा मुख्यमंत्री हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजे ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असते त्या पक्षाचा होतो. जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले तर त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत आमच्यामध्ये हाच फार्म्युला ठरला आहे.”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “आतापर्यंत आमच्यामध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर लढत होतोत तेव्हा ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत होता. आताही ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा फार्म्युला असेल. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीआधी आम्ही याबाबत काहीच ठरवणार नाहीये. त्यानंतर ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल”, असं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले आहेत.
News Title – Prithviraj Chavan big statement on CM post
महत्त्वाच्या बातम्या-
“राजकारणात भाजपला पोरंच होत नाही, म्हणून नकली संताने…”
होर्डिंग दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला समोर!
“ज्या रस्त्यावर लोकांचा मृत्यू झाला तिथे मोदींनी..”, संजय राऊत संतापले
राखी सावंतची प्रकृती अत्यंत खालावली, जीवनमरणाचा संघर्ष?; जवळच्या व्यक्तीकडून अपडेट
केरळनंतर राज्यात मान्सून कधी दाखल होणार?; हवामान खात्याकडून मोठी अपडेट






