ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलं, प्रकाश शेंडगेंचा राज्य सरकारला गंभीर इशारा

On: June 16, 2024 9:03 AM
Maharashtra Politics
---Advertisement---

OBC Reservation | मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच आपलं उपोषण मागे घेतलं आहे.सरकारसोबतच्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी एक महिन्याचा अवधी देत उपोषण मागे घेतलं आहे. अशात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जरांगे यांनी एक महिन्यात सरकारने निर्णय घेतला नाही तर, विधानसभेत पूर्ण तयारीने उतरू, असा इशाराच दिला आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारपुढे आता पेचच निर्माण झाला आहे.

हा मुद्दा शांत होत नाही तोच आता ओबीसी आरक्षण मुद्दा समोर आला आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत थेट इशाराच दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सगेसोयरेचा जीआर काढलात तरी आगामी निवडणुकीत त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.

“ओबीसी आरक्षणाला विरोध केलात तर..”;

शनिवारी एका ठिकाणी प्रसार माध्यमांशी (OBC Reservation) बोलताना प्रकाश शेंडगे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला. राज्य सरकारकडून आम्हाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही बैठकीला जाणार नाही. असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय.

जालन्यातली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी उपोषण सुरु केलं आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शेंडगे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसंच, ओबीसी आरक्षणावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.

“OBC आरक्षणाला धक्का लावणार नाही, याचं लेखी आश्वासन द्या”

दरम्यान, काल जालन्यात प्रकाश शेंडगे उपोषणस्थळी आले असता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोनवर संवाद झाला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, असं आश्वासन दिलं.

मात्र, आम्हाला याबाबत लेखी आश्वासन हवं, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत आहेत तर, दुसरीकडे ओबीसीकडून आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे यात राज्य (OBC Reservation)सरकार आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

News title – Prakash Shendge warns the government on OBC reservation

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती

आज ‘या’ राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल, मोठा धनलाभ होणार

राज्यात येत्या 48 तासात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी

धनंजय मुंडेंनी केलं पीडित कुटुंबीयांचं सांत्वन, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली

“इटलीमध्ये जाऊन मोदींचा थाट, पण मणिपूरकडे पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”

Join WhatsApp Group

Join Now