Prakash Shendge | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन आणि उपोषण करताना दिसत आहेत. मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत आणि सगेसोयरे अंमलबजावणीबाबत आरक्षणाची मागणी केली. यामुळे आता ओबीसी समाज आपलं आरक्षण बचावण्यासाठी राज्यातील रस्त्यांवर उतरला आहे. अशातच आता ओबीसी समाजाचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके हे गेल्या 6 दिवसांपासून उपोषण करताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला आरक्षणाची मागणी केली आहे. जर आरक्षण दिलं नाहीतर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.
“…तर आम्ही देखील ओबीसी नेत्याला उभं करू”
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. जर आरक्षण दिलं नाहीतर मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत उभे राहणार आहेत. त्यावर आता ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी मनोज जरांगे विधानसभेला उभे राहिल्यास आम्ही देखील ओबीसी नेत्याला उमेदवार देऊ, असं वक्तव्य प्रकाश शेंडगेंनी (Prakash Shendge) केलं आहे.
निवडणुकीला कोणी उभं राहावं आणि कोणी उभं राहू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. मात्र मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षणाचा. मराठा समाजाला सरकारने टीकणारं 10 टक्के आरक्षण दिलं असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता मराठा समाजाने ते आरक्षण घेण्यास सुरूवात केली आहे, असं प्रकाश शेंडगेंचं म्हणणं आहे.
“सर्वेक्षणात ओबीसी समाजाचं बहुमत”
पुढे प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) म्हणाले की, मनोज जरांगे उभे राहिल्यास ओबीसी उमेदवार देखील उभा राहिल. सर्वेक्षणानुसार आमचं बहुमत जास्त आहे. ओबीसी हे 60 टक्के आहेत. तसेच जर यामध्ये मुस्लिमांना ग्राह्य धरल्यास टक्केवारी ही 80 पर्यंत जात आहे. 199 मतदारसंघात सर्व्हे झाले असून त्यातून ही माहिती समोर आली आहे.
आर्थिक मागास प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण मिळत आहे. त्याचा लाभ आता मराठा समाजाला होताना दिसतोय. त्यातीलही 10 पैकी साडे 8 टक्के आरक्षण हे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी घेतलं असल्याचं प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) म्हणाले आहेत.
News Title – Prakash Shendge On Manoj Jarange Patil About Vidhansbha Election Maratha Reservation
महत्त्वाच्या बातम्या
ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचं बिनसलं?; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘तुमच्या बुडाखाली…’; किरण मानेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं
प्रसाद देठेंची सुसाईड नोट चर्चेत; पंकजा मुंडेंचंही घेतलं नाव
’24 तास काम करून लेकरांचं भागत नाही…’; मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं
युगेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’?, अखेर सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर






