ओबीसी समाज एकवटला; 57 लाख बोगस कुणबी नोंदी तातडीने रद्द करा,अन्यथा…

On: June 17, 2024 9:00 AM
Maharashtra Politics
---Advertisement---

Maharashtra Politics l गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. अशातच आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज तब्बल 288 जागांवर लढण्याची तयारी करणार असल्याचे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले आहे.

लोकसभेत ओबीसी उमेदवार 288 जागांवर लढणार :

ओबीडी संघटनांची विदर्भस्तरीय बैठक नागपूरमध्ये पार पडली आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणेच 288 जागांवर ओबीसी समाजाचे उमेदवार उभे करण्याचा इशारा या बैठकीतून प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार ओबीसी नेत्यांची समजूत घालण्याच्यादृष्टीने कोणती पावले उचलणार हे पाहावे देखील महत्वाचे असणार आहे.

नागपूर येथील ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी प्रकाश शेंडगे म्हटले की, आजच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवण्याचा ठराव मंजूर झाला आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगेसोयरेंचा शासन आदेश GR काढला तर राज्यातील ओबीसी समाज रस्त्यावर देखील उतरेल असा थेट इशारा प्रकाश शेंडगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Maharashtra Politics l 57 लाख कुणबी नोंदी रद्द कराव्यात :

याशिवाय, बैठकीत ओबीसी समाजाच्या भविष्यातील वाटचालीबाबत देखील चर्चा झाली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीच्या राज्यातून तब्बल 288 लढवणार असल्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

त्यामुळे ओबीसी बहुजन पार्टी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार यावर देखील एकमत झाले आहे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य सरकारने अलीकडच्या काळात केलेल्या 57 लाख कुणबी नोंदी या बोगस आहेत, त्या तातडीने रद्द कराव्यात अशी ओबीसी समाजाची मागणी असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे.

News Title –

Prakash Shendge OBC Reservation

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एनडीएला कमी जागा का मिळाल्या? रामदास आठवलेंनी केला मोठा दावा

…म्हणून महाविकास आघाडीला यश मिळाले; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण

आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात सावधानता बाळगावी

दान करते वेळी ‘या’ गोष्टी ठेवाव्या लक्षात, नाहीतर लागाल भिकेला

पुण्यात हादरून टाकणारी घटना, पत्नीला लॉजवर नेत पतीनेच केलं असं काही की..

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now