Prakash Ambedkar | राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला जोर आला असून सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विरोधी पक्षांचे नेतेही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी परभणी महानगरपालिकेच्या प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Prakash Ambedkar statement)
परभणीत झालेल्या या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या मतदारांबाबत मोठा दावा करत राजकीय वातावरण तापवले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या विधानांमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, त्यांच्या वक्तव्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसकडे आता मतदार उरलेला नाही? :
सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसकडे आता मतदारच उरलेला नाही. केवळ मुस्लिम मतदार त्यांच्या बाजूने राहिल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेसने शरद पवारांच्या नादी लागल्यामुळे पक्षाची ही अवस्था झाली असल्याची टीकाही त्यांनी केली. परभणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाबाजाणी दुर्राणी यांच्यावरही त्यांनी थेट आरोप करत टीकेची धार अधिक तीव्र केली.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावरही वादग्रस्त विधान केले. यामुळे काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नाराजी व्यक्त केली जात असून, या वक्तव्याचा निवडणुकीत काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vanchit Bahujan Aghadi news)
Prakash Ambedkar | मुस्लिम मतदारांना आवाहन आणि लोकशाहीवर भाष्य :
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी परभणीतील मुस्लिम मतदारांना थेट आवाहन केले. काँग्रेसकडे आता काही उरलेले नाही, असे सांगत संविधान टिकवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या विधानामुळे निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सभेनंतर बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी बिनविरोध नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले. आमदारांकडून उमेदवारांवर दबाव टाकला जात असून, अर्ज माघारी घेण्याची पद्धत बंद झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ही पद्धत सुरू राहिल्यास लोकशाही धोक्यात येईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (Parbhani Municipal Election 2026)
महायुतीतील पक्ष वेगवेगळे लढत असल्यावरून बोलताना त्यांनी भाजपवरही टीका केली. भाजपला स्थानिक राजकीय पक्ष संपवायचे असल्याचा आरोप करत, निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता आणि पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांच्या या विधानांमुळे परभणी महानगरपालिका निवडणूक प्रचारात राजकीय तापमान अधिक वाढले आहे.






