“मोदी पंतप्रधान होणार नाहीत, लोकांनी केवळ स्टंट म्हणून त्यांच्याकडे पाहावं”

On: May 31, 2024 7:00 PM
Prakash Ambedkar
---Advertisement---

Prakash Ambedkar । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगामी पंतप्रधान पदावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं. मोदी हे देशाचे पंतप्रधान होणार नाहीत. लोकांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केवळ स्टंट म्हणून पाहावं असं वक्तव्य आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.

“स्वत:च्या आई वडिलांना शिव्या देण्याची कला फक्त नरेंद्र मोदींकडेच”

स्वत:च्या आई वडिलांना शिव्या देण्याची कला फक्त नरेंद्र मोदी यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता एका देवाने दुसऱ्या देवाला साकडं घालणं हा स्टंट आता नरेंद्र मोदी करू शकतात. त्यामुळे लोकांनी नरेंद्र मोदींकडे एक करमणूक म्हणूनच पाहावं असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.

जागतिक तापमान वाढलंय त्यापेक्षा प्रतिनिधींपेक्षा सामान्य माणूस कसं बघतो हे फार महत्त्वाचं आहे. सामान्य माणूस तापमान वाढीबाबत चिंतित नाही, ते चिंतित आहे माझ्या समाजाचा माणूस कसा निवडून येईल याकडे लक्ष आहे. सामान्य माणासाला ग्लोबल वॉर्मिंगची चिंता नाही. ज्याची चिंता आहे त्याबाबत राजकीय पक्ष बोलत राहणार, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.

“शेतकऱ्यांनी त्यांना मतदान का केलं नाही?”

दिल्लीत वर्षभर आंदोलन सुरू होतं.  एकाही राजकीय पक्षाने हमीभाव देऊ, असं आपल्या अजेंड्यात म्हटल नाही. मग शेतकऱ्यांनी त्यांना मतदान का केलं नाही? असा सवाल प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उपस्थित केला आहे.

सामान्य माणसांच्या जीवनाशी त्यांना काहीही देणं-घेणं नाही. त्यांना कसलीही चिंता नाहीये.  असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यांचं हे वक्तव्य आता राजकारणात चर्चेत आलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत असं वक्तव्य केलं आहे. तसेच ते स्टंटबाजी करत असल्याचं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आता भाजपचे नेते प्रकाश आंबेडकर यांना काय प्रत्युत्तर देतील हे पाहणं गरजेचं आहे.

News Title – Prakash Ambedkar On Narendra Modi About His Prime Minister Post Statement

महत्त्वाच्या बातम्या

ऐश्वर्याचे ‘ते’ फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल, लाईक्सचा पडला पाऊस

“काय समज द्या, समज द्या लावलंय”; भुजबळांनी भाजप नेत्यांना सुनावलं

निकालापूर्वीच मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; थेट म्हणाले..

अनंत-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांसाठी असणार खास ‘ड्रेसकोड’; लग्नपत्रिका आली समोर

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने घेतला मोठा निर्णय!

Join WhatsApp Group

Join Now