Prajakta Mali | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून संपूर्ण महाराष्ट्रात रोष निर्माण झाला आहे. विशेषत: बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजूनही देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या जात नाहीयेत याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर सुरेश धसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका केलीये.
धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींची नाव घेतली. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी (Prajakta Mali) यांची नाव त्यांनी घेतली. प्राजक्ता माळी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
Prajakta Mali चा मोठा निर्णय
आकाची इथं 100 एकर जमीन आहे, तिकडे जमीन आहे, अशी माहिती समोर येत आहे. आम्ही त्यांचे सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा” असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला होता.
धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी हिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ती पत्रकार परिषदेद्वारे उत्तर देणार आहे. ‘माझी भूमिका मी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडणार’ असल्याचं प्राजक्ता माळी यांनी सांगितलं.
“महिला आयोगात तक्रार देणार”
सुरेश धस यांच्या या वक्तव्यावर प्राजक्ता माळी हिने आक्षेप घेतला आहे. प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने मनसे नेता आक्रमक, सुरेश धसांना झापलं
दुर्गप्रेमींनो ‘या’ किल्ल्यावर फिरायला जाणार असाल तर आत्ताच थांबा, 3 दिवस राहणार बंद!
पुण्याजवळच्या खेड, शिरूरमध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा संचार, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
राज्यात पुढील २ दिवस पावसासह गारपिटीचा इशारा; ऑरेंज अलर्ट… पाहा कुठे कुठे आहे इशारा
क्रेडिट कार्ड वापरणारांसाठी महत्त्वाची माहिती, आत्ताच वाचा नाहीतर भरावा लागेल मोठा दं






