मोठी बातमी! अजित पवार गटाच्या नेत्याला ईडीकडून दिलासा

Praful Patel | अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर ईडीची टांगती तलवार होती. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. मात्र आता प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यावरील असणारं ईडीचं सावट आता दूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा दिला आहे.

ईडीचा मोठा दिलासा

PMLA कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या 12 व्या आणि 15 व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली. जप्त करण्यात आलेल्या सीजे हाऊस प्लॅटची किंमत 180 कोटी रूपये होती.

काय होता आरोप?

ED ने 2022 मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकिचे किमान 7 फ्लॅट्स जप्त केले होते. इकबाल मिर्ची यांच्या पत्नीकडून ही मालमत्ता बेकायदेशीर खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. समोवारी ईडीने ही मालमत्ता ही इकबाल मिर्चीशी संबंधित नसल्याचं सांगितलं आणि जप्ती रद्द केली आहे.

ईडीने ज्या मालमत्तेवर कारवाई केली होती. त्यात दोन मजले हे इकबाल मिर्ची यांच्या कुटुंबाचे होते. त्यांना ईडीने आगोदरच जप्त केलं होतं अशी माहिती समोर आली आहे. ही मालमत्ता व्यवसायिक कामांसाठी उपयोगात होती. प्रफुल्ल यांच्यावर आरोप होता की, त्यांनी इकबाल मिर्चीशी करार करून ही संपत्ती खरेदी केली होती. ईडीनुसार हा करार 2007 मध्ये तयार झाला. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आरोप नाकारला होता. 2019 मध्ये प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी करण्यात आली होती.

कोरोनानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटा वेगळा झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असे गट तयार झाले. त्यानंतर महायुतीचं सरकार बनलं गेलं. तेव्हा अजित पवार गटाला प्रफुल्ल पटेल यांनी साथ दिली. त्यानंतर ईडीने नुकताच प्रफुल्ल पटेल यांना दिलासा दिल्याचं समजतंय.

News Title – Praful Patel Got A Big Relief From Ed

महत्त्वाच्या बातम्या

भाजपने असं काय केलं? थेट मनसेने घेतली माघार

राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

अजित पवार गटाचे ‘हे’ 6 आमदार नाराज; घरवापसी करणार? अजित पवार म्हणाले…

या राशीच्या व्यक्तींनी जोडीदाराविषयीचे गैरसमज टाळावेत

“देवेंद्र फडणवीसांमुळेच भाजपचा पराभव झाला”; ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य