प्रमोद महाजनांच्या हत्येवरून पूनम महाजनांचं मोठं विधान!

On: November 7, 2024 5:07 PM
Pooja Mahajan
---Advertisement---

poonam mahajan l ऐन विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच आता माजी खासदार पूनम महाजन यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्ये संदर्भात त्यांच्या कन्या म्हणजेच माजी खासदार पूनम महाजन यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी खासदार पूनम महाजन यांचा दावा :

माजी माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच भाजप नेते प्रमोद महाजन यांची त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी हत्या 2006 मध्ये केली होती. प्रवीण महाजन यांनी 22 एप्रिल 2006 रोजी मुंबई येथील वरळी या ठिकाणी प्रमोद यांच्या फ्लॅटमध्ये त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. मात्र आता केवळ पैशांसाठी आणि मत्सरापोटी हे कृत्य झालं नसून त्याच्यामागे मोठे षड्यंत्र आहे असं माजी खासदार पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.

मात्र आता माजी खासदार पूनम महाजन यांनी हा दावा केला आहे. तसेच तब्ब्ल 18 वर्षांनी या हाय प्रोफाईल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचं दिसत आहे. याशिवाय प्रमोद महाजन यांच्यावर झाडलेली गोळी ही एका माणसाच्या रागाची किंवा मत्सराची नव्हती. कारण त्या गोळीचे आणि बंदुकीचे पैसे देखील माझ्या वडिलांनीच दिले होते.

poonam mahajan l यामागचं षडयंत्र लवकरच कळेल :

याशिवाय पैसे इतके होते की, तुम्ही कोर्ट केस लढू शकला असता तर तुमचं आयुष्य हे घालवू शकला असता. पण त्याच्या यामागे ती गोळी एका माणसाच्या रागाची किंवा मत्सराची तर नव्हती. मात्र त्याच्या मागे अत्यंत मोठे षडयंत्र होतं. तसेच आज उद्या किंवा परवा कधीतरी कळेल की ते षडयंत्र नेमकं काय होतं.

मात्र त्यातूनच कळेल की हे सगळं का झालं. तर दोन भावांमध्ये हे भांडण काहीच नव्हतं असं माजी खासदार पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.

News Title – poonam mahajan on pramod mahajan death

महत्त्वाच्या बातम्या-

पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीवर सडकून टीका!

उद्धव ठाकरेंचं शिंदे गटावर खोचक शब्दात टीकास्त्र!

बंडखोरांना दणका! कॉँग्रेसकडून बड्या नेत्याच्या मुलासह ‘या’ बंडखोरांचं निलंबन

संजय राऊत माविआचे xxx, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते…

मुंडे बहीण भावावर प्रवीण महाजनांच्या पत्नीचा अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now