सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जायला पैसे ‘या’ व्यक्तीने पुरवले!

On: January 4, 2025 4:12 PM
Santosh Deshmukh Case
---Advertisement---

Santosh Deshmukh Case l मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने गदारोळ माजला आहे. या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी CID व SIT पथक देखील नेमक्यात आलं आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना राज्यातील विविध भागातून ताब्यात घेतलं आहे. अशातच आता पोलिसांनी नांदेडमधून डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांच्या वकील पत्नीला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

वायबसे दाम्पत्याला अटक :

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर 2024 डॉ. संभाजी वायबसे यांनी मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्याशी संपर्क साधला होता. कारण डॉ. संभाजी वायबसे यानेच आरोपींना पळून जाण्यास मदत केली, याशिवाय आरोपींना पळून जाण्यासाठी पैसे देखील पुरवले असल्याचा आरोपी त्यांच्यावर करण्यात आला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी, बीड पोलीस आणि सीआयडी पथक अलर्ट मोडमध्ये असून त्यांनी डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. तसेच डॉक्टर वायबसे हा ऊसतोड कामगारांचा मुकादम म्हणून देखील काम करतो. त्यामुळे आता डॉ. वायबसे व त्याच्या पत्नीला बीड पोलिसांनी नांदेडमधून ताब्यात घेतलं आहे. तसेच एसआयटीनं त्यांची कसून चौकशी देखील केली आहे.

Santosh Deshmukh Case l बीड पोलिसांची मोठी कारवाई :

दरम्यान, बीड पोलिसांच्या विशेष पथकाने आज पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी पुण्यातून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार सुधीर सांगळे याला अटक केली आहे.

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून लवकरच त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर केलं जाणार आहे. तसेच या अटकेच्या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन माहिती देखील देणार आहेत. मात्र या घटनेतील दोन आरोपींना ताब्यात घेतलं असल्याने अनेक धागेदोरे हाताला लागण्याची शक्यता आहे.

News Title : police arrest doctor sambhaji waibase and wife

महत्त्वाच्या बातम्या-

संतोष देशमुखांच्या भावाला मोठा संशय; “आरोपींना आश्रय देणारा हा…”

“यांच्या बापाचा बाप आला तरी आम्ही…”; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

सुदर्शन घुले अन् सुधीर सांगळेच्या मागील 10 वर्षाच्या गुन्ह्यांची यादी समोर!

घुले अन् सांगळेचा ठावठिकाणा कसा लागला?, सरपंच हत्येमागील मास्टरमाईंड दुसराच?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टरला अटक, त्याचा नेमका रोल काय?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now