बँकिंग क्षेत्रात खळबळ! पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा, खातेदारांचं काय झालं?

On: December 27, 2025 5:40 PM
PNB Loan Fraud
---Advertisement---

PNB Loan Fraud | देशभरातील कोट्यवधी नागरिक आपली आयुष्यभराची कमाई बँकांवर विश्वास ठेवून सुरक्षित ठेवतात. बँक म्हणजे आर्थिक सुरक्षिततेचा मजबूत आधार मानला जातो. मात्र, देशातील एक नामांकित सरकारी बँक पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे चर्चेत आली आहे. तब्बल 2,434 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा उघडकीस आल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (Punjab National Bank Scam)

विशेष म्हणजे, या घोटाळ्याची माहिती कोणत्याही तपास यंत्रणेने नव्हे तर खुद्द बँकेनेच अधिकृतरीत्या दिली आहे. या प्रकरणाचा थेट परिणाम बँकेच्या शेअर्सवरही दिसून आला असून गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.

नेमका घोटाळा काय आहे? :

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) शेअर बाजार बंद झाल्यानंतर केलेल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये हा गंभीर प्रकार उघड केला आहे. बँकेनुसार, एसआरईआय इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड (SEFL) आणि एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड (SIFL) या दोन कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली नाही.

या दोन्ही कंपन्यांना दिलेल्या कर्जाची एकूण रक्कम 2,434 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये एसआरईआय इक्विपमेंट फायनान्स लिमिटेडकडून 1,240.94 कोटी रुपये तर एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेडकडून 1,193.06 कोटी रुपयांचा थकबाकीदार व्यवहार समोर आला आहे. (Punjab National Bank Scam)

PNB Loan Fraud | ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? :

या प्रकरणात दिलासादायक बाब म्हणजे पंजाब नॅशनल बँकेने या संपूर्ण थकबाकी रकमेवर 100 टक्के प्रोव्हिजनिंग आधीच केलेले आहे. म्हणजेच, या कर्जामुळे सामान्य खातेदारांच्या ठेवींवर थेट कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती बँकेने दिली आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेअंतर्गत पार पाडण्यात आली असून याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेलाही (RBI) अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे.

शेअर बाजारात काय परिणाम झाला? :

हा घोटाळा समोर आल्यानंतर शुक्रवारी पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे अर्धा टक्का घसरण नोंदवण्यात आली. दिवसअखेर PNB चा शेअर 0.50 टक्क्यांनी घसरून 120.35 रुपयांवर बंद झाला. (PNB Loan Fraud)

मात्र, दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहता बँकेच्या शेअर्सची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअरने सुमारे 13 टक्के परतावा दिला असून 2025 या वर्षात आतापर्यंत 17 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

News Title : PNB Loan Fraud: ₹2,434 Crore Scam Exposed, Should Bank Customers Worry?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now