PMPML | पुणे (Pune) शहरातील बसप्रवास अधिक आधुनिक करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी ऑनलाइन तिकीट प्रणालीचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप (Aapli PMPML App) चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.
‘आपली PMPML’ ॲपचा वापर वाढवण्याची मोहीम :
पुण्यातील सार्वजनिक बससेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित सुविधा मिळाव्यात यासाठी PMPML प्रशासनाने डिजिटल तिकीट प्रणालीवर विशेष भर दिला आहे. सध्या ‘आपली PMPML’ ॲपच्या माध्यमातून प्रवासी मोबाईलवरूनच बसचे तिकीट खरेदी करू शकतात. यामुळे बसमध्ये चढल्यानंतर कंडक्टरकडून तिकीट घेण्याची गरज राहत नाही आणि वेळेचीही बचत होते. (PMPML digital ticket)
सध्या या ॲपचे सुमारे 24 लाख वापरकर्ते असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाचे लक्ष्य ही संख्या 50 लाखांपर्यंत नेण्याचे आहे. यासाठी एप्रिल महिन्यात विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेद्वारे अधिकाधिक नागरिकांना ॲप डाउनलोड करून बसप्रवास डिजिटल पद्धतीने करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
PMPML | QR कोडद्वारे थेट ॲप डाउनलोड सुविधा :
या उपक्रमाचा एक भाग म्हणून PMPML प्रशासन प्रवाशांमध्ये ॲपबाबत जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. शहरातील प्रमुख बसथांबे, बसमधील आसन आणि बसच्या बाहेरील भागावर विशेष स्टिकर्स लावण्याची योजना आखण्यात आली आहे. या स्टिकर्सवर QR कोड (QR Code) देण्यात येणार असून तो स्कॅन करताच प्रवाशांना थेट ‘आपली PMPML’ ॲप डाउनलोड करता येईल. (online bus ticket Pune)
या ॲपमुळे बसचे रिअल-टाइम लोकेशन, वेळापत्रक आणि तिकीट खरेदी यासारख्या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतात. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहताना अचूक माहिती मिळू शकते. तिकीट घेताना सुट्ट्या पैशांवरून होणारे वादही टाळता येतात. PMPML चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड (Mahesh Awhad) यांनी सांगितले की, शहरातील अधिकाधिक नागरिकांनी या ॲपचा वापर केल्यास बसप्रवास अधिक वेगवान, सोयीस्कर आणि आधुनिक पद्धतीने करता येईल.






