PM Ujjwala Yojana Online Apply 2024 l घरबसल्या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज

On: January 16, 2024 11:19 AM
PM Ujjwala Yojana Online Apply 2024
---Advertisement---

PM Ujjwala Yojana Online Apply 2024 l प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) ही गरीब कुटुंबांना मोफत LPG कनेक्शन देण्यासाठी भारत सरकारने राबवलेली योजना आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना विशेष करून महिलांना मोठा दिलासा मिळत आहे. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला ही योजना (PM Ujjwala Yojana Online Apply 2024) केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहकार्याने चालवली जात आहे.

दारिद्र्य रेषेखाली असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येत आहे. त्यासाठी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येत आहे. चला तर मग जाणून घेऊयात या योजनेचा लाभ कसा घेयचा आणि त्यासाठी काय कागदपत्र लागत आहेत ते पाहुयात…

PMUY योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा :

1. सर्वात प्रथम PMUY च्या https://www.pmuy.gov.in/. या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. यानंतर “नवीन उज्ज्वला 2.0 कनेक्शनसाठी अर्ज करा”.
3. यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर प्रविष्ठ करा.
4. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
5. यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP एंटर करा.6. पुढे तुमचे नाव, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा.
7. यानंतर तुमची संमती द्या आणि “सबमिट” बटणावर क्लिक करा.
8. अशाप्रकारे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल.

PMUY योजनेचा लाभ घेण्यासाठी या अटी लागू (PM Ujjwala Yojana) :

1. अर्जदार महिला असणे आवश्यक आहे.
2. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
3. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 1 लाखांपेक्षा कमी आणि शहरी भागात 2 लाखांपेक्षा कमी असावे.
4. अर्जदाराच्या कुटुंबाकडे आधीपासून कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावे.

PMUY योजनेचा लाभ घेण्यासाठी लग्नराई आवश्यक कागदपत्र (PM Ujjwala Yojana Documents) :

1.अर्जदाराचे आधार कार्ड.
2. अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड.
3.अर्जदाराचे बँक खाते पासबुक.
4. अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र.

 महत्त्वाच्या बातम्या –

Woman Mental Health Tips l महिलांनी आताच व्हा सावध, ही लक्षणं असतील तर तुमची मानसिक स्थिती नाही बरोबर!

Reliance, TCS सह ‘या’ 5 शेअर्सची छप्परफाड कमाई, एका आठवड्यात कमावले तब्बल 2 लाख कोटी!

Inflation l अबब! 400 रुपयांमध्ये मिळतायेत फक्त 12 अंडी, अन् 250 रुपये किलो झाला कांदा

Eye Care Tips lअशी घ्या डोळ्यांची काळजी, चाळीशीनंतरही लागणार नाही चष्मा!

Stock Market रेकॅार्डब्रेक उंचीवर पोहोचलं, या 5 स्टॅाक्सनी दिले बक्कळ रिर्टन्स!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now