शेतकऱ्यांनो ‘ही’ कामाची गोष्ट लवकर करा अन्यथा… पश्चाताप होईल

On: January 13, 2025 5:27 PM
Farmer News
---Advertisement---

Farmer News l राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही पीएम पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली नाही, त्यांनी लवकरत लवकर करून घ्या. कारण पीएम पीक विमा नोंदणी करण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करून आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

पिकांचा विमा काढण्याची अंतिम मुदत काय? :

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पीएम पीक विमा ही योजना राबवत असते. कारण या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढता येतो. मात्र आता या योजनेचा पीक विमा काढण्याची अंतिम दिनांक ही 15 जानेवारी आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांकडे नोंदणीसाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पोर्टल लिंक आणि हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केला आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत कमी पैसे भरून शेतकरी पिकांचा विमा काढू शकतात. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक संकटाचा देखील सामना करावा लागणार नाही आणि नुकसान भरपाईसाठी विम्याची रक्कम देखील केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांना दिली जाते.

Farmer News l शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी :

दरम्यान, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेशी संबंधित अधिक माहिती किंवा काही तक्रार असल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकतात. याशिवाय शेतकरी किसान कृषी रक्षक पोर्टलला देखील भेट देऊ शकतात. तसेच शेतकरी 14447 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकतात.

याशिवाय 7065514447 या क्रमांकाच्या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर देखील मेसेज पाठवून आपली तक्रार नोंदवू शकतात. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नोंदणी करणे गरजेचे आहे.

News Title : pm pik vima yojana deadline 15th january

महत्वाच्या बातम्या –

वाल्मिक कराडला फाशी द्या! ‘या’ आमदाराने केली मागणी

जरांगेंना मिठी मारून धनंजय देशमुख ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?

संतोष देशमुखांना ‘या’ व्यक्तींनी दिली होती जीवे मारण्याची धमकी!

आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरवात! जाणून घ्या शाही स्नानाच्या तिथी

सरपंच हत्या प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक, केल्या ‘या’ मोठ्या मागण्या?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now