PM Kisan Yojana l केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतात. अशातच केंद्र सरकारने राबवलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही देशातील सर्वच शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची मदत करतात. मात्र आता या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट्स समोर आली आहे.
ई-केवायसी करणे आवश्यक :
केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 17 व्या हफ्त्याची वाट शेतकरी पाहात होते. मात्र अखेर आता शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. आज म्हणजेच 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा 17 वा हफ्ता जमा होणार आहे. म्हणजेच आज शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ देशातील साधारण 9.26 कोटी शेतकऱ्यांना होत आहे. या योजनेअंतरागत शेतकऱ्यांना टप्प्या टप्प्याने 2 हजार रुपयांची मदत केली जाते. अशातच आता आज देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे. ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
PM Kisan Yojana l या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना पेरणीला होणार :
लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींनी पदभार स्वीकारताच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आजपासून म्हणजेच 18 जूनपासून शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होत.
सध्या देशातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले आहे. तर देशभरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात देखील केली आहे. यामध्ये खते, औषध फवारणी यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. अशापरिस्थितीत शेतकऱ्यांच्या बँख खात्यात आता दोन हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे या पैशांची मदत शेतकऱ्यांना पेरणीला होणार आहे.
News Title – PM Kisan Nidhi Yojana 17 th installment
महत्त्वाच्या बातम्या
उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात; पाऊस आला तर काय होणार?
या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो
राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी
‘हा’ बडा नेता सत्तेतून बाहेर पडणार?; राज्याच्या राजकारणात खळबळ
“हनीमूनच्या दिवशी माझ्या शरिरावर…”, करिश्माच्या खुलाशाने खळबळ!






