शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! पीएम किसानचा २२ वा हप्ता ‘या’ महिन्यात जमा होणार

On: January 9, 2026 4:35 PM
PM Kisan Yojana
---Advertisement---

PM Kisan Yojana | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 21 हप्त्यांचा लाभ मिळाल्यानंतर आता शेतकरी 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, यावेळी सरकारकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील 2000 रुपयांचा हप्ता थांबू शकतो अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. (PM Kisan 22nd Installment)

पीएम किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी मोठा आधार मिळतो. आता मात्र 22 व्या हप्त्यापूर्वी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

22 वा हप्ता कधी जमा होणार? :

उपलब्ध माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये जारी केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर वेळोवेळी अपडेट तपासत राहणे आवश्यक आहे. कोणतीही अधिकृत सूचना किंवा तारीख जाहीर झाल्यास ती थेट पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यावेळी हप्ता वितरणात विलंब होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः नवीन नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांचा हप्ता अडकण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (PM Kisan 22nd Installment)

PM Kisan Yojana | फार्मर आयडी आणि e-KYC अनिवार्य :

पीएम किसान योजनेत यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे युनिक Farmer ID अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की केवळ e-KYC पूर्ण करून चालणार नाही, तर ज्यांच्याकडे Farmer ID नसेल, त्यांचा 22 वा हप्ता रोखला जाऊ शकतो. Farmer ID ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख असून, त्यामध्ये जमीनधारणा, पिकांची माहिती, शेतीशी संबंधित तपशील आणि उत्पन्नाचा रेकॉर्ड समाविष्ट असतो. योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यासोबतच e-KYC प्रक्रिया देखील अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांचे पैसे थांबू शकतात. आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती अचूक असणेही आवश्यक आहे. नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक, बँक खाते बंद असणे, IFSC कोड बदललेला असणे किंवा जमिनीच्या नोंदी अपडेट नसणे, अशा कारणांमुळेही हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सर्व माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.

News Title: PM Kisan 22nd Installment Date 2026: When Will Farmers Get ₹2000?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now