पितृपक्षात पूर्वज ‘या’ चार रूपात येतात, चुकूनही त्यांचा अपमान करू नका

On: September 20, 2024 3:12 PM
Pitru Paksha 2024
---Advertisement---

Pitru Paksha 2024 l शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून म्हणजेच 18 सप्टेंबर 2024 पासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे. पितृ पक्षाचा दिवस हा सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो, कारण या वेळी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्वपित्री अमावस्येला पितृलोकात परत जातात. पितृपक्षालाच श्राद्ध पक्ष असेही म्हणतात. यंदाच्या वर्षी श्राद्ध पक्ष हे 2 ऑक्टोबर 2024 रोजी संपणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणकोणत्या रूपात येतात. तर आज आपण या यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात…

पूर्वज कोणत्या रूपात येतात?

पक्ष्यांच्या रूपात :

असं म्हंटल जात की, पितृपक्षाच्या काळात पूर्वज पक्षी, विशेषतः कावळे, कबूतर व चिमण्यांच्या रूपात येत असतात. त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात पक्ष्यांना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय कावळा किंवा इतर पक्षाने आपण दिलेलं अन्न खाल्ल्यास पितर तृप्त होतात असे मानले जाते.

मानवी स्वरूपात :

पितृपक्ष काळात अनेकवेळा पूर्वज हे संत किंवा भिक्षुकांच्या रूपाने देखील येतात. त्यामुळे या काळात कोणत्याही साधू, संत किंवा गरीबाला अन्नदान करावे. तसेच संत किंवा गरजूंचा अपमान करू नये. त्यामुळे आपले पूर्वजही आपल्या घरी या रूपात पाहुणे म्हणून येऊ शकतात.

Pitru Paksha 2024 l या काळात हे प्राणी दारात आल्यास हाकलू नका :

पूर्वज स्वप्नात येणे :

पितृपक्ष काळात अनेकवेळा पूर्वजांचे स्वप्न पडतात. कारण या काळात पूर्वज त्यांच्या वंशजांच्या स्वप्नात दर्शन देऊन संकेत देतात. जर स्वप्नात पितर आनंदी दिसले तर ते आपल्यासाठी खूपच शुभ चिन्ह आहे, परंतु ते रागावलेले दिसले तर ते अपूर्ण श्राद्ध किंवा तर्पणचे लक्षण असण्याची शक्यता असते.

प्राण्यांच्या रूपात :

श्राद्ध पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये पितर गाय किंवा कुत्र्याच्या रूपात देखील घरी येऊ शकतात. पितृपक्षात कुत्रा किंवा प्राणी तुमच्या दारात आला तर त्याला हाकलून किंवा मारून लावू नका, तर त्याला भाकरी खायला द्या.

News Title : Pitru Paksha Avoid This Mistakes

महत्वाच्या बातम्या –

खुशखबर! जिओकडून ग्राहकांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट

बापरे! तिरुपती प्रसादाच्या लाडूत चक्क ‘या’ प्राण्यांची चरबी; देवस्थान समितीचे सदस्य म्हणाले…

सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

घटस्फोटाच्या चर्चा दरम्यान, अभिषेक बच्चनने उचललं मोठं पाऊल!

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार; ‘या’ पक्षांचा समावेश

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now