Pitru Paksha 2024 l अनंत चतुर्दशीच्या दिवसापासूनच म्हणजेच उद्यापासून (17 डिसेंबर) पितृपक्ष सुरु होणार आहे. या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि पितरांची पूजा केली जाते. पितृपक्षाला श्राद्ध पक्षाच्या नावाने देखील ओळखलं जातं. श्राद्ध पक्षात पितृ तर्पण, पितृ पूजा आणि पिंड दान करणं सर्वात पुण्याचं मानलं जातं.
या गोष्टी अर्पण करा :
यावेळी पितृ पक्षातील द्वितीया तिथी कमी झाल्यामुळे पितरांचे आशीर्वाद घेण्यासाठी पूर्ण 14 दिवस मिळणार आहेत. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितरांना पाणी आणि तीळ अर्पण केल्याने आत्मा तृप्त होतो. त्यांचे आशीर्वाद कुटुंबाला समृद्धीच्या मार्गावर घेऊन जातात.
शास्त्रात तीन ऋण सांगितले आहेत. पितरांचे ऋण, देवाचे ऋण आणि गुरुचे ऋण. या तिन्ही ऋणांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे पितृ पक्षात काही गोष्टी करणे महत्वाचे मानले जाते.
Pitru Paksha 2024 l पितृ पक्षात ‘या’ गोष्टी करा :
– पितृ पक्षात ब्राह्मनांना भोजन आणि वस्त्र दान करुन श्राद्ध करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
– श्राद्ध पक्षात गाय, कुत्रा, कावळा मुंग्यांना भोजन देणं अत्यंत लाभदायक मानलं जातं.
– पितृ पक्ष या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं फार अत्यंत शुभ मानलं जातं.
– मान्यतेनुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष होतो त्यांना या काळात गया, उज्जैन यांसारख्या इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करणं महत्वाचं असत.
– पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूण यांसारख्या पदार्थांचं सेवन करु नये.
– या काळात विवाह, पूजा व गृहप्रवेश यांसारखे कोणतीही शुभ कार्य करू नये.
– मान्यतेनुसार, या कालावधीत कपडे आणि बूटं यांसारखी खरेदी करु नये.
– असं म्हणतात की, या दरम्यान केस व नखं कापू नये.
– या काळात नवीन वस्त्र, सोनं, चांदी यांसारख्या वस्तू खरेदी करू नये.
News Title- Pitru Paksha 2024
महत्वाच्या बातम्या-
…तर हा नेता महाविकास आघाडीच्या वळू- रेड्यांना चाबकाने फोडून काढणार
पुणे हादरलं! भररस्त्यात गोळीबार अन् पुढे घडल भयंकर
राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस; ‘या’ आमदाराची जीभ घसरली
शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, ‘या’ नेत्याची जहरी टीका
स्वित्झर्लंड विसरा, हनीमूनसाठी बेस्ट आहेत भारतातील ‘ही’ 4 ठिकाणं!






