PGCIL Recruitment 2024 l सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (PGCIL) भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक उपकंपनी असलेल्या सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (CTUIL) अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना एकप्रकारे ही एक आनंदाचीच बातमी आहे.
या तारखेपर्यंत करू शकता अर्ज :
PGCIL कंपनीने 12 जून रोजी जारी केलेल्या जाहिरातीनुसार इलेक्ट्रिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये एकूण 435 अभियंता प्रशिक्षणार्थींची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार, कंपनीच्या careers.powergrid.in या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात.
इच्छुक उमेदवार हे अर्जाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते 4 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. तसेच PGCIL-CTUIL अभियंता प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कंपनीने विहित केलेले 500 रुपये शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावे लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांना भरावे लागणार नाहीत.
PGCIL Recruitment 2024 l GATE मधून निवड केली जाणार :
PGCIL ने जारी केलेल्या अभियंता प्रशिक्षणार्थी भरती अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी रिक्त पदांशी संबंधित शाखेत किमान 60 टक्के गुणांसह BE किंवा B.Tech किंवा B.Sc (इंजिनीअरिंग) पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, तुम्ही GATE 2024 परीक्षेत वैध गुण प्राप्त केले असावेत.
यासह उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर 31 डिसेंबर 2023 पासून वयाची गणना केली जाणार आहे. जर तुम्हीही या पात्रतेसाठी इच्छुक असाल तर तुम्ही 4 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकता. याशिवाय careers.powergrid.in या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात.
News Title – PGCIL Recruitment 2024
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल
पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली! कोणते मुद्दे गाजणार
आज शनीदेव या राशींच्या आयुष्यात बदल घडवणार; मिळणार गोड बातमी
लंके-मारणेच्या भेटीवरून राजकारण तापलं; रोहित पवारांनी मागितली माफी
शिंदे सरकारची मोठी घोषणा, वारीतील प्रत्येक दिंडीला मिळणार ‘इतके’ हजार रूपये






