राजस्थानचे शिलेदार पंजाबचा धुव्वा उडवण्यास सज्ज; आज रंगणार PBKS vs RR सामना

On: April 13, 2024 8:12 AM
PBKS vs RR Pitch Report
---Advertisement---

PBKS vs RR Pitch Report l आयपीएल 2024 च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. राजस्थानला शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी पंजाबच्या किंग्जला सनरायझर्स हैदराबादने एका रोमांचक सामन्यात 2 धावांनी पराभूत केले. अशा परिस्थितीत दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्यासाठी उत्सुक असणार आहेत.

PBKS vs RR Pitch Report l मुल्लानपूरची खेळपट्टी कशी आहे? :

पंजाब आणि राजस्थान (PBKS vs RR) यांच्यातील रोमांचक सामना हा मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पंजाबचे हे नवे होम ग्राउंड असून त्यावर आतापर्यंत आयपीएलचे फक्त दोन सामने खेळले गेले आहेत. या दोन सामन्यांमध्ये भरपूर चौकार आणि षटकार पाहायला मिळाले आहेत. यापैकी एका सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला, तर दुसऱ्यामध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावर नाणेफेकीने आतापर्यंत कोणतीही महत्त्वाची भूमिका दाखवलेली नाही.

पंजाब किंग्जला गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. संघाच्या टॉप ऑर्डरची कामगिरी या मोसमात काही खास राहिलेली नाही. शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांच्या फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. त्याच बरोबर प्रभसिमरन सिंग देखील IPL 2024 मध्ये फ्लॉप झाला आहे. मात्र शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी गेल्या दोन सामन्यांमध्ये तुफान कामगिरी केली आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य प्लेयर्स :

PBKS चे संभाव्य शिलेदार : शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, हरप्रीत सिंग, सॅम कुरन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

RR चे संभाव्य शिलेदार : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (सी/के), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल

News Title : PBKS vs RR Pitch Report

महत्त्वाच्या बातम्या : 

या राशीच्या व्यक्तीने फसवणुकीपासून सावध राहावे

दिनेश कार्तिकची बॅटिंग पाहून भरमैदानात रोहित म्हणाला असं काही की…, व्हिडीओ व्हायरल

सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, उचललं मोठं पाऊल

आरसीबी विरुद्ध विकेट्सचा ‘पंच’, बूमराहने पटकावली पर्पल कॅप

11 अफेअर्स करत विवाह न करता अभिनेत्री झाली आई, कारण आलं समोर

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now