‘जोधा अकबर’ फेम परिधी शर्माचं हटके ट्रांसफॉर्मेशन; फोटो पाहून म्हणाल..

Paridhi Sharma | ‘जोधा अकबर’ या मालिकेत जोधाची भूमिका साकारणारी अभिनेत्री परिधी शर्मा चर्चेत आली आहे. ‘जोधा अकबर’ या मालिकेमुळे परिधी हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. तिने आपल्या करीअरची सुरुवात ‘तेरे मेरे सपने’मधून केली होती.

मात्र, परिधीला ‘जोधा अकबर’ मालिकेने नवी ओळख मिळवून दिली. तिचा चाहता वर्ग मोठा वाढला. अभिनेता रजत टोकससोबत तिची जोडी तेव्हा प्रचंड हिट ठरली होती. मालिकेत जोधा आणि अकबर यांची भूमिका साकारणारे परिधी आणि रजत यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती.

परिधी शर्माचं हटके ट्रांसफॉर्मेशन

सध्या परिधीची एक पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.परिधी हिने ‘नो मेकअप’ लूक आणि काळ्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

फोटोमध्ये ‘नो मेकअप’ लूकमध्ये देखील परिधी अतिशय सुंदर दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये  ‘निसर्गाच्या सानिध्यात…’असं लिहिलं आहे.10 वर्षांनंतर परिधीचं हे हटके ट्रांसफॉर्मेशन (Paridhi Sharma ) चाहत्यांनाही हैराण करणारं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Paridhi Sharma (@paridhiofficial)

परिधी शर्माची पोस्ट चर्चेत

परिधी शर्मा हिच्या मालिकांबद्दल सांगायचं झालं तर, जोधा अकबर मालिकेत झळकण्यापूर्वी तिने करिअरच्या सुरुवातील खलनायकाच्या भूमिका देखील साकारल्या होत्या. पहिल्यांदा अभिनेत्री 2010 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ मध्ये दिसली होती. त्यानंतर अभिनेत्री ‘रुक जाना नही’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

त्यानंतर 18 जून 2013 मध्ये सुरू झालेल्या ‘जोधा अकबर’ मालिकेमुळे परिधी एकदमच प्रकाशझोतात आली. दोन वर्ष चाहत्यांचं मनोरंजन केल्यानंतर 7 ऑगस्ट 2015 मध्ये मालिकेने चाहत्यांचा (Paridhi Sharma ) निरोप घेतला. या मालिकेनंतर परिधी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहात असते.

News Title –  Paridhi Sharma Transformation

महत्त्वाच्या बातम्या-

“लाडकी बहीण योजनेची भीक नको, 1500 रूपयांमध्ये संसार होणार आहे का?”

फळभाज्यांचे दर कडाडले; भाव गेले थेट शंभरी पार

दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; पोस्ट ऑफिसकडून बंपर भरती

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी; बजेटमध्ये PF संदर्भात होणार मोठा निर्णय?

“मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या”; मराठा संघटनांची मागणी