Pankaja Munde l आज दसऱ्याच्या मुहूर्तावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला आहे. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. मात्र त्यांच्या पराभवानंतर बीडमधील पाच युवकांनी थेट स्वत:चे जीवन संपवले होते. या घटनेचा देखील उल्लेख पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात केला आहे. तसेच यावेळी पंकजा मुंडे यांनी विरोधकांना देखील थेट इशारा दिला आहे.
मी राजकारणाला चिटकून बसणारी नाही :
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी गरीबांसाठी काम करणारी आहे. त्यामुळे मी राजकारणाला चिटकून बसणारी नाही. माझ्या पराभवामुळे पाच लेकरांनी जीव दिला. मग त्या आमदारकीचं तरी काय गोड वाटणार?. तसेच आमदारकी खासदारकी देखील माझ्याकडे काही नव्हती, तरी देखील पाच वर्ष तुम्ही दसरा मेळाव्याला आला आणि उद्याही याल. त्यामुळे आपल्याकडे काही असो नसो. त्यामुळे मी तुमच्या मागे येणारच आहे.
याशिवाय जो वंचित आहे. ज्याची पत आणि ऐपत देखील नाही. अशा लोकांसाठी मी राजकारणात आहे. तर मी गाड्या घेण्यासाठी नाही. तसेच टेबलाखालून पैसे घेण्यासाठी मी नाही. फक्त तुम्ही म्हणता म्हणून मी हेलिकॉप्टरने येते. तुम्ही म्हटला तर मी बैलगाडीतून देखील यायला तयार आहे असे दसऱ्या मेळाव्यात बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
Pankaja Munde l पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते :
दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, कितीही वर्ष लागो तुमचं जीवन मी सुसह्य केल्याशिवाय श्वास घेणार नाही. तसेच तुमच्या मुलांच्या अंगावरचा मळका शर्ट पाहून मला देखील वेदना होते. त्यामुळे आता पंकजा मुंडे कुणाला घाबरत नाही. तर आता पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते.
या मैदानात माझं भाषण ऐकायला लोकं येणार नाही त्या दिवसाला मी नक्की घाबरेल. त्यामुळे भगवान बाबांना मी प्रार्थना करते असा दिवस कधीही येऊ देऊ नको.
News Title – Pankaja Munde Dasara Melava Speech
महत्त्वाच्या बातम्या-
“आमचा धक्का लागतो म्हणता, मग आता..”; जरांगे पाटलांची सरकारला केली थेट विचारणा!
आता उलथापालथ करावीच लागेल, पर्यायच नाही; मनोज जरांगे कडाकडले
घरात सुख-समृद्धीसाठी आज राशीनुसार ‘या’ वस्तु खरेदी करा!
पंकजा मुंडे यांचं जरांगेंच्या मेळाव्याबाबत सर्वात मोठं विधान!
दसऱ्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा अडचणींमध्ये होईल वाढ






