Palash Muchhal | सिंगर-कंपोजर पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. हळद, मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडल्यानंतर अखेर दोघांचं लग्न मोडलं आणि ही बातमी सर्वत्र पसरली. यानंतर पलाशवर बेवफाईचे आरोप होऊ लागले. स्मृतीची फसवणूक करत असल्याचे आणि लग्नाच्या काळातच दुसऱ्या मुलीशी संबंध असल्याचे दावे सोशल मीडियावर चर्चेत आले.
पलाश मुच्छलने विद्यान मानेवर मानहानीचा खटला दाखल केला :
या प्रकरणात आता स्मृतीचा बालपणीचा मित्र आणि अभिनेता-निर्माता विद्यान माने याने पलाशविरोधात धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, लग्नाच्या दिवशीच पलाश दुसऱ्या मुलीसोबत रंगेहात सापडला होता आणि त्या घटनेनंतर महिला क्रिकेटर्सनी त्याला मारहाण केली होती. तसेच पलाश आणि त्याच्या कुटुंबावरही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला.
या आरोपांना प्रत्युत्तर देत पलाश मुच्छलने (Palash Muchhal) विद्यान मानेवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे पलाशने सांगितले की, त्यांच्या वकिलांनी विद्यान माने यांना १० कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठवली आहे. खोटे, अपमानजनक आणि प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आरोप करून बदनामी केल्याचा दावा पलाशने केला आहे.
Palash Muchhal | नेमकं प्रकरण काय? :
विद्यान माने यांनी दिलेल्या विधानांमुळे पलाश (Palash Muchhal) आणि स्मृतीच्या (Smriti Mandhana) तुटलेल्या नात्याबाबत नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
मात्र पलाशने हे सर्व आरोप फेटाळून लावत हे आपल्या प्रतिमेला बदनाम करण्याचा कट असल्याचं म्हटलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं असून, या वादाचा पुढील निकाल काय लागतो याकडे चाहत्यांचं आणि माध्यमांचं लक्ष लागलं आहे.
News Title: Palash Muchhal Files Defamation Case After Shocking Allegations Post Breakup with Smriti Mandhana
Palash Muchhal, Smriti Mandhana, Celebrity News, Defamation Case, Bollywood Singer
पलाश मुच्छल, स्मृती मानधना, सेलिब्रिटी बातमी, मानहानी खटला, बॉलिवूड गायक






