Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे पत्नीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून पतीने चाकूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. (Pune Crime News)
वादातून चाकूने हल्ला, पत्नीचा जागीच मृत्यू :
मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय 19, रा. शिरसवडी, ता. हवेली) हिचे काही सोन्याचे दागिने गहाण ठेवलेले होते. ते दागिने सोडवून देण्याची मागणी ती वारंवार पती शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय 30, रा. बकोरी, ता. हवेली) याच्याकडे करत होती. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. (Husband Kills Wife)
शनिवारी आरोपी शैलेंद्रने नम्रताला वाडेबोल्हाई परिसरात बोलावून घेतले. तेथे पुन्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या शैलेंद्रने त्याच्याकडील लोखंडी चाकूने नम्रताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या नम्रताचा जागीच मृत्यू झाला.
Pune Crime News | आरोपी अटकेत, चाकू जप्त :
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शाहरुख दस्तगीर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शैलेंद्र व्हटकर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gold Jewellery Dispute)
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेला लोखंडी चाकू जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






