‘ऐश्वर्याला मुस्लिम बनवून लग्न करणार!’, पाकिस्तानातून मौलानाचा मोठा दावा

On: November 28, 2025 3:39 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बॉलिवूडची विश्वसुंदरी आणि जागतिक पातळीवर चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण आहे पाकिस्तानातील एका मौलानाने केलेले धक्कादायक, विचित्र आणि आक्षेपार्ह वक्तव्य. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पॉडकास्ट व्हिडीओमध्ये या मौलानाने ऐश्वर्याबद्दल लग्नाच्या संदर्भात धक्कादायक दावा केल्याने भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही संताप व्यक्त केला जात आहे. (Pakistani Maulana controversy)

या व्हिडीओत पाकिस्तानातील धर्मगुरू मुफ्ती अब्दुल कवी यांनी दावा केला आहे की, पुढील काही महिन्यांत ऐश्वर्या राय त्यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवू शकते. “दोन ते चार महिन्यात तिच्याकडून मला मेसेज येईल,” असे म्हणत त्यांनी केवळ विचित्रच नव्हे तर अभिनेत्रीबद्दल अनादरपूर्ण वक्तव्य केले आहे. यामुळे या संपूर्ण विधानावर सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू आहे.

ऐश्वर्याला ‘मुस्लिम बनवणार’, नावही बदलणार? :

व्हिडीओमध्ये कवी यांनी पुढे आणखी धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर त्यांनी ऐश्वर्या रायशी लग्न केले, तर सर्वात आधी तीला इस्लाम स्वीकारायला सांगतील. इतकेच नाही तर त्यांनी आधीच तिच्यासाठी एक ‘मुस्लिम नाव’ही निवडलं असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते ऐश्वर्याचं नाव बदलून ‘आयेशा राय’ ठेवतील आणि त्यानंतर तिच्याशी निकाह करणार आहेत.

या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे, अवमानकारक आणि प्रसिद्ध व्यक्तींना अनावश्यकपणे लक्ष्य करणारे असल्याचे म्हटले आहे. विशेषतः ऐश्वर्याच्या कुटुंबाबाबत आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल कवी यांनी केलेल्या दाव्यांवर अधिकच संताप व्यक्त झाला आहे.

Aishwarya Rai | अभिषेक–ऐश्वर्या वेगळे होणार, असा दावा करून उद्भवली खळबळ :

मौलानाने केवळ ऐश्वर्याबाबतच (Aishwarya Rai) नव्हे, तर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नातेसंबंधांबाबतही बिनबुडाचे दावे केले. “मी ऐकलंय की ते दोघे वेगळे होणार आहेत,” असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, जर हे जोडपं वेगळं झालं, तर ऐश्वर्या त्यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवेल. त्यांच्या या विधानावर नेटिझन्सनी जोरदार टीका करत त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे दावे करणारा ‘पब्लिसिटी सीकर’ म्हटलं आहे. (Pakistani Maulana controversy)

मात्र, अभिषेक किंवा ऐश्वर्याकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तरीही कवी यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे आणि व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळत आहेत.

राखी सावंतलाही दिला होता लग्नाचा प्रस्ताव :

मुफ्ती कवी यांचा हा पहिलाच वादग्रस्त दावा नाही. यापूर्वी त्यांनी भारतीय अभिनेत्री आणि डान्सर राखी सावंतशी (Rakhi Sawant) लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर राखी सोबत लग्नाची तारीखही 14 फेब्रुवारी अशी जाहीर केली होती. कवी यांच्या म्हणण्यानुसार राखी लग्नानंतर इस्लामिक पोशाख घालण्यास तयार झाली होती. मात्र राखी सावंतने त्यांचा प्रस्ताव उघडपणे फेटाळून लावला होता.

या पार्श्वभूमीवर कवी यांचे ऐश्वर्या रायबद्दलचे नवीन दावे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. सोशल मीडियावर या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत आणि अनेकांनी पाकिस्तानातील धर्मगुरूची ही वक्तव्ये हास्यास्पद, असत्य आणि महिलांचा अपमान करणारी असल्याचे म्हटले आहे.

News Title: Pakistani Maulana Claims Aishwarya Rai May Send Him Marriage Proposal; Controversial Remarks Spark Outrage

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now