पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा भडका! जाणून घ्या पेट्रोल प्रति लिटरची किंमत किती?

On: March 23, 2026 5:05 PM
Iran India Oil Trade
---Advertisement---

Pakistan Petrol Price Hike | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. विशेषतः आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या Pakistan वर याचा मोठा परिणाम झाला आहे. इंधनाच्या किमती आधीच वाढलेल्या असताना आता पाकिस्तान सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. (Pakistan petrol price per litre)

जागतिक स्तरावर वाढलेल्या तेलाच्या किमती आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. त्यामुळे सरकारला इंधनावरील कर आणि लेवी वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

हाय-ऑक्टेन इंधनावर 300 रुपयांची लेवी :

पाकिस्तान सरकारने लक्झरी कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या हाय-ऑक्टेन इंधनावर मोठी लेवी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान Shehbaz Sharif यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी हाय-ऑक्टेन इंधनावर प्रति लिटर 100 रुपयांची लेवी आकारली जात होती.

मात्र आता या लेवीमध्ये आणखी 200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हाय-ऑक्टेन इंधनावर एकूण 300 रुपये प्रति लिटर इतकी लेवी लागू झाली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे दरमहा सुमारे 9 अब्ज रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार असून हा निधी सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी वापरला जाणार आहे.

Pakistan Petrol Price Hike | दरवाढीपूर्वी पेट्रोल पंपांवर गर्दी :

दरवाढीची घोषणा होण्यापूर्वी अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. स्वस्त दरात इंधन मिळवण्यासाठी नागरिकांनी आपल्या वाहनांच्या टाक्या भरून घेतल्या. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्याचेही पाहायला मिळाले.

दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे सामान्य वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सध्या कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तरीदेखील पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर इतर देशांच्या तुलनेत आधीच जास्त असल्याचे सांगितले जात आहे. (Pakistan Petrol Price Hike)

याआधीही या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर सुमारे 55 रुपयांनी वाढवल्या होत्या. याशिवाय सरकारी खर्च कमी करण्यासाठी मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे पगार कमी करण्यात आले होते. तसेच सरकारी वाहनांसाठी दिला जाणारा इंधन भत्ता 50 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

News title : Pakistan Petrol Price Hike

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now