सर्वसामान्यांना कांदा रडवणार! दर कमी होणार की नाही?

On: September 11, 2024 3:59 PM
Onion Price
---Advertisement---

Onion Price l सध्या कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा तब्ब्ल 80 रुपये किलोवर पोहोचला आहे. याशिवाय सरासरी कांद्याचा दर हा तब्ब्ल 50 रुपये किलोच्या आसपास पोहचला आहे. त्यामुळे कांदा असणाऱ्या शेतकऱ्यांना हा एकप्रकारे मोठा दिलासाच आहे.

ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका :

मात्र कांद्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसू नये म्हणून राज्य सरकारने उपाययोजना करुन देखील कांद्याचे दर वाढतच चालले आहेत. राज्य सरकारने उपायोजना करुन देखील कांद्याचे दर वाढतच चालले आहेत. त्यामुळे अनेक शहरात सरकारने कमी दरात कांद्याची विक्री देखील सुरु केली आहे.

मात्र, तरी देखील कांद्याचे दरात घसरण होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्य सरकारने सवलतीच्या दरात कांदा विकण्यास देखील सुरवात केली आहे. मात्र असे असतानाही किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा तब्ब्ल 80 रुपये किलोवर कायम आहे.

Onion Price l किरकोळ बाजारात सध्या स्थिती काय आहे? :

कांद्याच्या किरकोळ बाजाराचा विचार केला तर किरकोळ बाजारात कांद्याची कमाल किंमत ही 80 रुपये प्रति किलो आहे, तर काही बाजारात कांदा 27 रुपयांपर्यंत स्वस्त दराने विकला जात आहे. काल 10 सप्टेंबर रोजी देशभरात कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 49.98 रुपये प्रति किलो होती.

तसेच कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने आठवडाभरापूर्वीच सवलतीच्या दरात कांद्याची विक्री सुरू केली आहे. मात्र याअंतर्गत 35 रुपये किलो या सवलतीच्या दरात कांदा लोकांना उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राज्य सरकारने हा उपक्रम गेल्या 5 सप्टेंबरपासून सुरू केला आहे.

News Title : Onion Price Hike

महत्वाच्या बातम्या-

या दोन मोठ्या बँकांना RBI ने दिला दणका; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मलायका अरोराच्या वडिलांचा टोकाचा निर्णय; नेमकं काय झालं होतं?

भारीच! ह्युंदाईच्या ‘या’ नवीन कारचे दरवाजे तुमच्या फोनने होणार अनलॉक

सर्वात मोठी बातमी! मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या

संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट, मटन अन् ..; संजय राऊतांनी हिंदुत्वावरून सुनावलं

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now