Vegetable Prices l देशात किरकोळ चलनवाढीचा दर सातत्याने कमी होत असला तरी खाद्यपदार्थांची चलनवाढ मात्र कायम आहे. अशातच देशातील उत्पादन आणि पुरवठा घटल्यामुळे टोमॅटो, बटाटे व कांद्याच्या किंमतींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे टोमॅटो, कांदा व बटाट्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.
बटाटे आणि कांद्याच्या किंमतीत प्रचंड वाढ :
शेतकऱ्यांना टोमॅटो, बटाटा व कांद्याच्या दरवाढीचा चांगलाच फायदा होत आहे. टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये प्रतिकिलो टोमॅटोची किंमत 80 ते 100 रुपये झाली आहे तर दिल्लीत टोमॅटोचे दर 120 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.
केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, वेळेवर पाऊस सुरू झाल्याने टोमॅटो, कांदा आणि बटाटा यांसारख्या बागायती पिकांच्या आशा वाढल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या तिन्हींच्या किमती कमी होऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Vegetable Prices l टोमॅटोचे दर 80 रुपये किलोवर :
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 5 जून 2024 रोजी दिल्लीच्या घाऊक बाजारात बटाटा 2,050 रुपये प्रति क्विंटलने विकला जात होता. हे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 67.35 टक्के अधिक आहे. 5 जून 2023 रोजी बटाट्याची घाऊक किंमत 1,225 रुपये होती. त्याचप्रमाणे, कांद्याचा सध्याचा भाव 2,825 रुपये प्रति क्विंटल आहे, जो एका वर्षापूर्वीच्या 1,575 रुपयांच्या किमतीपेक्षा 79.37 टक्के अधिक आहे.
टोमॅटोच्या बाबतीत, घाऊक भाव एक वर्षापूर्वीच्या तुलनेत कमी आहेत. गेल्या वर्षी 5 जून रोजी टोमॅटोचा घाऊक भाव 6,225 रुपये प्रतिक्विंटल होता. यंदा 5 जून रोजी घाऊक बाजारात टोमॅटोची 3,600 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. म्हणजे एका वर्षापूर्वीच्या किमती 42.17 टक्के कमी आहेत. मात्र, किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढू लागले आहेत.
News Title – Onion, Potato, Tomato Prices Hike
महत्वाच्या बातम्या-
मुंबईकरांनो ‘या’ कारणामुळे मुंबईतील ‘हे’ रस्ते 4 दिवस बंद राहणार; असा असणार पर्यायी मार्ग
मनोज जरांगेच्या शांतता रॅलीला आजपासून सुरवात; असा असणार रॅलीचा मार्ग
पुण्यात रात्री घडला धक्कादायक प्रकार; महिला पोलिसावर पेट्रोल ओतलं..पुढं काय घडलं
ब्रेकिंग! खासदार रविंद्र वायकरांना क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे
T20 वर्ल्डकपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेशी भिडणार, जाणून घ्या सामन्याची संपूर्ण माहिती






