आनंदाची बातमी! वनप्लस कंपनीने लाँच केला भन्नाट फीचर्ससह स्मार्टफोन

OnePlus Smartphone l एकेकाळी iPhone शी स्पर्धा करणारा OnePlus आता बजेट फोन लाँच करत आहे. कंपनीने एका इव्हेंटमध्ये आपला नवीन OnePlus Nord CE 4 Lite 5G फोन लाँच केला आहे. या फोनमध्ये कंपनीने भन्नाट फीचर्ससह 55000mAh बॅटरी, AMOLED डिस्प्लेसह अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. तर आज आपण जाणून घेऊयात या फोनच्या फीचर्सबद्दल सविस्तर माहिती…

OnePlus Nord CE 4 Lite 5G स्मार्टफोन लाँच :

OnePlus Nord CE 4 Lite 5G या स्मार्टफोनची विक्री 27 जूनपासून सुरू होणार आहे. या OnePlus फोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 2100 nits चा पीक ब्राइटनेस असणार आहे. यासोबतच या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14 OS वर आधारित OxygenOS 14 वर चालणार आहे.

या OnePlus फोनच्या मागील पॅनलमध्ये 50MP Sony LYT-600 प्राइमरी सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. OnePlus स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. या उपकरणाच्या 5500mAh क्षमतेच्या बॅटरीला 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच यामध्ये 5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट आहे. तर व्हर्च्युअल रॅम वैशिष्ट्यासह या फोनची रॅम क्षमता 16GB पर्यंत वाढत आहे.

OnePlus Smartphone l किंमत किती असणार? :

Nord CE4 Lite 5G OnePlus ने आपला नवीन फोन दोन रॅम आणि स्टोरेज प्रकारांमध्ये लाँच केला आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या पहिल्या व्हेरियंटची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेले दुसरे व्हेरियंट 23,999 रुपये किमतीत लाँच केले गेले आहे.

तसेच विशेष लॉन्च ऑफरमुळे यावर 1000 रुपयांची सूट देखील दिली जात आहे. हे डिव्हाइस खरेदी केल्यावर निवडलेल्या बँक कार्ड्सद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांची त्वरित सूट दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हीही हा स्मार्टफोन 27 जूनपासून खरेदी करू शकतात.

News Title – OnePlus Nord CE 4 Lite 5G Smartphone Launch

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; ताबडतोब ‘या’ 5 गोष्टींची काळजी घ्या!

पुण्यात ‘झिका’चे रुग्ण आढळल्याने खळबळ, काय आहेत या आजाराची लक्षणं?

पुण्यात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ

विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी आज मतदान; आता महायुती की महाविकास आघाडी?

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ कंपनीचा IPO बाजारात दाखल