मोठी बातमी! आणखी एका भयंकर अपघाताने पुणे हादरलं

On: June 19, 2024 7:45 PM
Pune Accident
---Advertisement---

Pune Accident | पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचं सत्र सुरू आहे. पुण्यात आणखी एक अपघात झाल्याचं समोर आलं आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वडगांव चौकात मालवाहू कंटेनरचा विचित्रपणे अपघात झाला आहे. पुन्हा एकदा एका भयंकर अपघाताने पुणे हादरलं आहे.

मुंबईहून पुण्याच्या दिशेला जात असलेला कंटेनर स्कूल बसला वाचवण्याच्या नादात थेट सर्व्हिस रस्त्यावरील असणाऱ्या दुकानात शिरला. हा अपघात इतका भीषण होता की यात ती महिला जागीच ठार झाली आहे आणि तेथे उपस्थित इतर पाच जणांना देखील फटका बसला आहे.

पुण्यात आणखी एक अपघात

या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून कंटेनर चालकसह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत सुदैवाने शाळेच्या बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

Pune Accident | चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

वडगाव मावळ येथील एका हॉस्पिटल येथील स्टॉपवर अनेक पालक मुलांना स्कूल बसमध्ये सोडवण्यासाठी आले होते. त्यावेळी स्कुलबसने भर रस्त्यात अचानक ब्रेक मारत थांबा घेतला. त्यामुळे पाठीमागून येत असलेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्कूल बसला वाचवण्याच्या नादात दुकानात गेला.

अपघातामुळे जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वडगांव मावळ पोलीसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करत वाहतूक सुरळीत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘आधी बळीचा बकरा बनवलं, आता…’; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

ऐश्वर्या आणि जया बच्चन यांचं बिनसलं?; ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘तुमच्या बुडाखाली…’; किरण मानेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं

प्रसाद देठेंची सुसाईड नोट चर्चेत; पंकजा मुंडेंचंही घेतलं नाव

’24 तास काम करून लेकरांचं भागत नाही…’; मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now