“आता राऊत आले की लोक टीव्हीच बंद करतात”

On: February 11, 2023 7:08 PM
---Advertisement---

मुंबई | शिंदेंनी(Eknath Shinde) बंड केलं आणि शिवसेनेत(Shivsena) मोठी फूट पडली. शिंदेंच्या या बंडापासून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाचा कलगितुरा रंगला आहे. दिवसेंदिवस हा वाद चिघळतच चालल्याचे दिसत आहे.

त्यातच आता शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर(Sanjay Raut) जोरदार हल्लाबोल केला आहे. देसाई म्हणाले की, संजय राऊत सकाळी माध्यमांशी बोलतात तेव्हा कितीजण त्यांना पाहतात याचा सर्वे आता माध्यमांनीच केला पाहीजे. मी अनुभव घेतला आहे, असंही ते म्हणाले.

आधी लोक राऊतांना ऐकायचे पण आता राऊत आले की टीव्हीच बंद करतात. त्यामुळं राऊतांची दखल घ्यायची गज नाही, असा टोलाही देसाई यांनी राऊतांना लगावला. यावेळी ते विटा येथे माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्या प्रकरणावरही देसाईंनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असंही देसाईंनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now