नोव्हेंबरमध्ये तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार! पाहा सुट्ट्यांची यादी

On: October 30, 2024 12:50 PM
November bank holiday
---Advertisement---

November bank holiday l अवघ्या दोन दिवसांनी नोव्हेंबर महिना सुरु होणार आहे. या महिन्यातही साप्ताहिक सुट्यांव्यतिरिक्त देशातील अनेक शहरांमध्ये अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोव्हेंबर महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. तर आपण जाणून घेऊयात देशभरात नेमक्या बँका कधी बंद राहणार आहेत.

November bank holiday l कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी सुट्टी असणार? :

1 नोव्हेंबर : त्रिपुरा, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड,मेघालय, सिक्कीम आणि मणिपूरमध्ये दिवाळी, कुट महोत्सव आणि कन्नड राज्योत्सवानिमित्त बँका बंद राहतील.

2 नोव्हेंबर : गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, सिक्कीम, उत्तर प्रदेशमध्ये दिवाळी, लक्ष्मी पूजा, विक्रम संवत नवीन वर्षाच्या दिवशी बँका बंद राहतील.

3 नोव्हेंबर : साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

7 नोव्हेंबर : बंगाल, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये छठ यात्रेमुळे निमित्त बँका बंद राहणार आहेत.

8 नोव्हेंबर (शुक्रवार): बिहार, झारखंड आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये छठ (सकाळी अर्घ्य)/वंगला उत्सवानिमित्त बँका बंद राहतील.

9 नोव्हेंबर (शनिवार): महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँकाना सुट्टी असेल.

10 नोव्हेंबर : साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

12 नोव्हेंबर (गुरुवार): उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हैदराबाद-तेलंगणा, ओडिशा, चंदीगड, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, नागालँड, बंगाल, छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, इगास-बागवालच्या निमित्ताने श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.

15 नोव्हेंबर (शुक्रवार): मिझोराम, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, महाराष्ट्र, उत्तराखंड, हैदराबाद-तेलंगणा, जम्मू, उत्तर प्रदेश, नागालँड, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, बंगाल, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, श्रीनगरमध्ये गुरुनानक जयंती/कार्तिक पौर्णिमा/रहस पौर्णिमेनिमित्त बँक हॉलीडे असेल.

17 नोव्हेंबर (रविवार): साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

18 नोव्हेंबर : कनकदास जयंतीनिमित्त कर्नाटकात बँकांना सुट्टी असेल.

23 नोव्हेंबर : मेघालयमध्ये सेंग कुत्स्नेमनिमित्त बँका बंद राहतील. महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

24 नोव्हेंबर : साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

News Title – November bank holiday list

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांनी केलेली ‘नक्कल’ अजितदादांच्या जिव्हारी लागली! अजित पवार म्हणाले…

राज्यात 288 आमदार पदासाठी तब्बल ‘इतके’ अर्ज दाखल

राज्यात 47 मतदारसंघात होणार शिंदे विरुद्ध ठाकरे सामना, कोण मारणार बाजी?

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

लाडक्या बहीणींना महिन्याला 1500 नाही तर 3000 रुपये मिळणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now