‘ते माझ्या बॅाडी पार्ट्सवर…’; अभिनेत्री नोरा फतेहीच्या वक्तव्याने बॅालिवूडमध्ये खळबळ

On: April 23, 2024 5:44 PM
nora fatehi
---Advertisement---

Nora Fatehi | बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या हाॅट अदांनी तरुणांचं लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावर नोराची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. लाखो तरुण आणि तरुणी नोराच्या डान्सवर फिदा आहेत. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नोरा कायम नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. एवढंच नाही तर अनेक वेळा नोरा पापाराझीच्या कॅमेरामध्ये कैद झाल्याचं पहायला मिळतं. मात्र, पापाराझीच्या वागणुकीबद्दल नोराने एक खुलासा केला आहे.

काय आहे प्रकरण?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना नोराने (Nora Fatehi) पापाराझीने केलेल्या गोष्टीबाबत संताप व्यक्त केला आहे. नोरा म्हणाली की, मी अनेकवेळा पापाराझीसमोर गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी आधी कधीच हीप पाहिली नसेल. हे मी फक्त माझ्याबदलच नाही सांगत तर बाकी अभिनेत्र्यांबाबत देखील असं घडलं आहे.

पापाराझी शरीराच्या दुसऱ्या भागांवर देखील झूम करतात. त्यामुळे असं वाटतं, त्यांच्याकडे झूम करण्यासाठी दुसरं काहीही नाही. मात्र, पापाराझींच्या वागणुकीमुळे मी कधीच माझ्यावर परिणाम होऊ देत नाही.

माझ्या शरीरावर गर्व आहे-

पुढे बोलत असताना नोरा (Nora Fatehi) म्हणाली की, पापाराझीमुळे मला कधीही फरक पडला नाही, उलट मला माझ्या शरिरावर गर्व आहे. सुदैवाने मला खूप चांगली शरीरयष्टी मिळाली आणि याचा मला अभिमान आहे. माझ्या शरीरयष्टीची मला कधीच लाज वाटत नाही. दुर्दैवाने सोशल मीडियावर या गोष्टी ट्रेंड होत आहेत. ते फक्त सोशल मीडिया अल्गोरिदम गेम खेळत आहेत.

नोराचा हाॅट अंदाज-

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

तसं पाहायला गेलं तर फिल्म स्टार्सचं ग्लॅमर पापाराझीशिवाय अपूर्ण आहे. बऱ्याचदा पापाराझी आणि फिल्मस्टार्समधील कनेक्शन हे फार चांगलं असतं. त्याचप्रमाणे अनेकदा सेलिब्रेटी या पापाराझींवर भडकतात देखील.

News Title : Nora Fatehi talk about paparazzi behavior

महत्त्वाच्या बातम्या-

“पार्थला भाऊ म्हणून सांगतो…”, रोहित पवारांचा उपरोधिक टोला

“मंगळसूत्र कशासाठी?…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

हार्दिक पांड्या T20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या अडचणी वाढवू शकतो!

घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर सलमान खानने घेतला सर्वात मोठा निर्णय!

आम्ही स्वतःला सुरुवातीलाच अडचणीत आणलं!, हार्दिकनं पराभवाचं खापर फोडलं रोहित शर्मावर!

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now