Nitish Kumar | राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची (Nitish Kumar) प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मेदांता रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या हाताला वेदना झाल्याचं दिसून आलं होतं. यामुळे आता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रूग्णालयाच्या ओर्थेापेडिक विभागात नितीश कुमारांची (Nitish Kumar) तपासणी करण्यात आल्याचं दिसून आलं.
नितीश कुमार रूग्णालयात दाखल
नितीश कुमारांच्या (Nitish Kumar) हाताला वेदना जाणवत होत्या. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या धाकधुकीत नितीश कुमारांचे कार्यक्रम वाढले होते. तसेच त्यांचे इतर काही दैनंदिन कार्यक्रम देखील वाढले असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचं दिसून आलं.
निवडणुकीच्या कळातही प्रकृतीत बिघाड
बिहारच्या कामांबाबत ते सक्रिय होते. गेल्या दोन वर्षांमध्ये बैठकी घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कॅबिनेट बैठक देखील बोलवली होती. यामुळे नितीश कुमारांना आरामाची संधी मिळाली नाही. त्यामुळे नितीश कुमारांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, निवडणुकीच्या कळात देखील त्यांची प्रकृती बिघडली होती.
नितीश कुमार यांची लोकसभा निवडणुकीच्या काळात देखील प्रकृती बिघडली होती. बिहारमधील भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्या अंत्यसंस्काराला देखील ते जाऊ शकले नाही. नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील ते गेले नव्हते. तर काही ठिकाणी निवडणुकीत प्रचाराचे कार्यक्रम नितीश कुमार यांनी रद्द केले होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आणि लालू प्रसाद यांची सत्ता होती. मात्र त्यानंतर नितीशजींनी मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासोबत नितीशकुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडले आहेत. त्यानंतर ते पुन्हा आता एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत.
News Title – Nitish Kumar Health Update
महत्त्वाच्या बातम्या
SBI ग्राहकांना सर्वात मोठा झटका; बँकेने घेतला मोठा निर्णय
अखेर मलायकाने प्रेग्नंसीबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली ‘या महिन्यात बाळाला….’
उपोषण स्थगित केल्यानंतर अंतरवाली सराटीतून मोठी बातमी समोर!
आलिया भट्टचा पुन्हा नको तसला व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, “…हे भयानक”
“मला मित्रासोबत झोपवलं आणि…”, करिश्मा कपूरच्या वक्तव्याने बॉलिवूड हादरलं






