Nitin Waghmare Death | मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच ठाकरे गटासाठी (Shiv Sena Uddhav Thackeray) मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार नितीन वाघमारे (Nitin Waghmare Death) यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मनमाड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Manmad election news)
मनमाड निवडणुकीत धक्का, निवडणूक प्रचारात फेरबदलाची शक्यता :
नितीन वाघमारे (Nitin Waghmare Death) हे परिसरातील परिचित आणि सक्रिय कार्यकर्ते होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा मृत्यू हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाच्या प्रचारात, उमेदवारांच्या भेटीगाठी तसेच कार्यकर्त्यांच्या उत्साही वातावरणात ही दुर्दैवी घटना घडल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनेक नागरिक आणि स्थानिक नेत्यांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीतून श्रद्धांजली वाहिली आहे.
मनमाड नगर परिषदेसाठी तब्बल 9 वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी 9 आणि नगरसेवकांच्या 33 जागांसाठी एकूण 215 उमेदवार रिंगणात आहेत. बहुरंगी लढत असल्याने प्रभागनिहाय मोठी राजकीय चुरस दिसून येत आहे.
Nitin Waghmare Death | निवडणुकीच्या गणितात बदल होण्याची शक्यता :
या निवडणुकीत शिवसेना, भाजप (BJP) आणि आरपीआय महायुतीसोबत रणांगणात उतरले आहेत. तर उद्धव ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, तसेच अनेक अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या तुल्यबळ लढतीत वाघमारे यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणुकीच्या गणितात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Manmad election news)
या घटनेनंतर ठाकरे गटात शोक व्यक्त करण्यात येत असून पार्टी स्तरावर पुढील निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली जाण्याची माहिती दिली आहे. नितीन वाघमारे यांच्या आकस्मिक जाण्याने मनमाडमधील निवडणूक वातावरणात गंभीरता आणि दुःखाचे सावट पसरले आहे.






