Nitesh Rane | रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते नारायण राणे विरूद्ध ठाकरे गटाचे नेते आणि उमेदवार विनायक राऊत यांच्यात लढत झाली. या लढतीत नारायण राणेंनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर नारायण राणे यांनी कोकणात शिवसेना संपली असं विधान केलं होतं. त्याला आजच्या सामना अग्रलेखातून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.
राणे हे आधीच्या मोदी सरकारात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग खात्याचे मंत्री होते. नव्या रालोआ मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिण्या आल्या व त्यातूनच ‘शिवसेना संपली, संपवली’ अशी भाषा बोलू लागले. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. यावरच आता नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
“जनेतेने शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितलंब त्यामुळे संजय राऊत व विनायक राऊत यांना मिरच्या झोंबल्या आहेत. कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो असं राऊत आणि ठाकरेंना वाटतं का? आमच्या कोकणातील जनतेचा अपमान कोण करत असेल तर आमची जनता त्यांना गाडून टाकेल, उद्धव ठाकरे यांना कोकणातील जनता समजली नाही”, असा टोला यावेळी नितेश राणे यांनी लगावला आहे.
तसंच पुढे ते म्हणाले की, सामान्य मतदारांचा अपमान करण्याचं काम उद्धव ठाकरेंचे कारटे करत आहेत. उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही, असा इशाराच यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल
त्यामुळे पुन्हा एकदा राणे-ठाकरे वाद सुरू झाला असल्याचं दिसून येतंय. आदित्य ठाकरे यांनी ईव्हीएमवरून भाजपवर आरोप केले होते. त्यालाही प्रत्युत्तर देत नितेश राणे यांनी त्यांना आव्हानच दिलं आहे.
“भाजपाच्या कार्यालयात आम्हाला म्याव म्यावचा आवाज येत नाही. एलॉन मस्कचा आधार घेण्यापेक्षा वरळीमध्ये काय सुरूये, त्याकडे लक्ष द्या. तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर वरळीतून उभा राहून दाखव.”, असं आव्हान नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरे यांना दिलं आहे.
News Title – Nitesh Rane on Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या-
“डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला…”; ठाकरे गटाने राणेंना डिवचलं
सर्वसामान्यांनी खायचे तरी काय?, फळभाज्यांचे किलोचे दर शंभरी पार; पालेभाज्याही महागल्या
‘सेक्स, सेक्स, सेक्स’; अनिल कपूरच्या उत्तराने करण जोहरला पण बसला धक्का!
‘लालपरी’ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!
शेतकऱ्यांनो स्मार्ट शेती करण्यासाठी हे 3 सोलर उपकरणे वापरा; खर्च होईल कमी






